*कोकण Express*
*जनार्दन कांबळे यांचे निधन*
*कासार्डे : संजय भोसले*
साळीस्ते बौध्द विकास मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार जनार्दन गोविंद कांबळे यांचे वृद्धापकाळाने शनिवारी निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. मुंबई महापालिका येथून ते सेवानिवृत्त झाल्यानंतर सालिस्ते येथे विविध संस्थाच्या माध्यमातून कार्यरत होते.
साळीस्ते बौध्द विकास मंडळाचे सरचिटणीस, साळी स्ते तंटामुक्त अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उत्तम सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे,दोन सुना,मुली दोन ,दोन त्यांचे भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.