बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रास श्री मा.उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित् तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्या वतीने मेडीसीन वाटप

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रास श्री मा.उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित् तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्या वतीने मेडीसीन वाटप

*कोकण Express*

*बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रास श्री मा.उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित् तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्या वतीने मेडीसीन वाटप*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

मा. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात जनरल मेडिसिन सावंतवाडी ( शिवसेना ) उद्धव ठाकरे गट तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या माध्यमातून
औषधांचे वाटप नुकतेच करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, शब्बीर मणीयार, अल्पसंख्याक उपाध्यक्ष रियाज खान, शहरप्रमुख तथा ग्रा.पं. सदस्य साईप्रसाद काणेकर, ग्रा.पं सदस्या देवल येडवे, ग्रा. पं. रिया येडवे, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, डाँ.मयुरेश पटवर्धन, औंकार नाडकर्णी, आदि मान्यवर उपस्थित होते.
मा.उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम जिल्ह्यात आयोजित करण्यात आले होते. यामध्येच बांदा प्राथमिक आरोग्य केद्रांतील रुग्णांना सेवा मिळावी या उद्देशाने सदर मेडीसीन उपलब्ध करुन देण्यात आल्याचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी सांगितले. या कार्यक्रमात ज्ञानेश्वर येडवे,अशोक परब,सागर धोत्रे, श्रीकांत धोत्रे, व्यंकटेश ऊरुमकर आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!