*कोकण Express*
*तन,मन.धन आर्पन करून शाळा व संस्थेसाठी जीवन जगणारा अवलिया म्हणजे ज. तु. दळवी होय:-अध्यक्ष के. आर.दळवी*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
कळसुली इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्टस प्रशालेमध्ये कै.ज.तु.दळवी यांचा जन्मशताब्दी वर्ष सोहळा साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी चेअरमन के.आर.दळवी , माजी स्कूल कमिटी सेक्रेटरी- प्रकाश दळवी,मुख्याध्यापक व्ही.व्ही वगरे,शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष- जयवंत घाडीगावकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष- शिवाजी गुरव , शिक्षक पालक संघ सदस्य- प्रभाकर दळवी , श्वेता दळवी, शारदा सावंत, निळकंठ मा. मुंडले, ज्येष्ठ शिक्षक एस. के. सावळ, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकामध्ये व्ही व्ही.वगरे यांनी कै.ज.तु.दळवींच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या अथक परिश्रमाची विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली.
मनोगत व्यक्त करताना शिवाजी गुरव यांनी स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.तसेच कै. ज.तु.दळवींच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा असे मत व्यक्त केले.
प्रकाश दळवी गुरुजी यांनी प्रशालेतील विविध उपक्रमांचे कौतुक करत स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.कै.ज. तु. दादां सोबत काम करताना आलेले अनुभव, त्यांच्या आठवणी त्यांनी विद्यार्थ्यांसमोर कथन केल्या.
अध्यक्षीय भाषणात बोलताना के.आर. दळवी यांनी ज.तु. दळवींच्या विविध गतस्मृतींना उजाळा दिला आणि त्यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर चित्रीत केला. कामासाठी झपाटलेपण आणि प्रसंगी तन-मन-धन अर्पून त्यांनी शाळा व संस्थेसाठी आपलं जीवन व्यतीत केलं याची विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली.
कळसुली शिक्षण संघ मुंबईचे अध्यक्ष पुरूषोत्तम दळवी, कार्याध्यक्ष सुर्यकांत दळवी, सरचिटणीस विजय सावंत तसेच सर्व पदाधिकारी यांनी कै.ज.तु.दळवी यांना अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या दुसर्या सत्रात झालेल्या वक्तृत्व स्पर्धा मध्ये प्राथमिक गट इयत्ता पाचवी ते सातवी यामध्ये प्रथम क्रमांक अश्मित शैलेश मुळीक द्वितीय श्रावणी संतोष राणे तर तृतीय क्रमांक भूमी आनंद पाडावे यांनी पटकावला माध्यमिक गटात प्रथम क्रमांक मंदार मोती वरक, द्वितीय क्रमांक तन्वी संतोष राऊळ, तर तृतीय क्रमांक रसिका नंदन गावकर हिने पटकावला, तर उच्च माध्यमिक गटात प्रथम श्रावणी विजय घाडीगावकर, द्वितीय गिरीश मनोज घाडीगावकर तर तृतीय क्रमांक पूर्वा प्रसाद सावंत या विद्यार्थीनीने प्राप्त केला.या स्पर्धेत सुमारे 48 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यशस्वी विद्यार्थ्यांबरोबरच स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक प्रशालेचे मुख्याध्यापक, संस्था पदाधिकारी ,शिक्षक व शिक्षकेतर वृंद पालक, ग्रामस्थ इत्यादी वर्गातून केले गेले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद सावंत यांनी केले तर शेवटी आभार ज्येष्ठ शिक्षक एस. के. सावळ यांनी मानले.