शिडवणे नं.१ शाळेच्या मुलांनी घेतली रानभाज्यांची चव

शिडवणे नं.१ शाळेच्या मुलांनी घेतली रानभाज्यांची चव

*कोकण Express*

*शिडवणे नं.१ शाळेच्या मुलांनी घेतली रानभाज्यांची चव*

*प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना ठरली उपयुक्त*

*कासार्डे प्रतीनीधी : संजय भोसले*

पावसाळ्यात विविध रानभाज्या फुलत असतात. ग्रामीण भागात ह्या भाज्या म्हणजे खाद्य पर्वणीच असते. दररोज एक नवी रानभाजी मिळू शकते. श्रावणात उगवणाऱ्या रानभाज्या पोषण करणाऱ्या असतात. मुले मात्र या रानभाज्या खाताना कुरकुर करतात.
शाळेत सुरु असलेल्या प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेंतर्गत मुलांना पोषण आहार दिला जातो.शिडवणे नं.१ शाळेमध्ये परिसरात उपलब्ध रानभाज्या आणल्या जातात. कधी पालक , ग्रामस्थ स्वतःहून मुलांसाठी भाज्या आणून देतात.
या आठवड्यात शाळेतील 51 मुलांना ‘पाथरी’ ची रानभाजी खाता आली. अळूची भाजी खाताना नाक मुरडणाऱ्या मुलांनी अळूचं फतफतं मागून मागून खाल्लं. पावसाळ्यात अशा रानभाज्या देण्यापूर्वी त्याविषयी अधिक माहिती शिक्षकांनी मुलांना दिली. मुलांच्या ज्ञानात भर पडली. टाकळा , खोडशी , भारंगी, करटोली , कुर्डु , रानमाठ , आघाडा , चुका अशा अनेक प्रकारच्या रानभाज्या मिळतील तशा शाळेतील मुलांना दिल्या तर मुलांना त्या खाण्याची सवय होईल. या रानभाज्यांमध्ये पोषकतत्त्वे अधिक असल्याने मुलांच्या आरोग्यासाठी या भाज्यांचे सेवन हितकारक ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!