शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खांबाळे केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खांबाळे केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

*कोकण Express*

*शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खांबाळे केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप*

*सरपंच गौरी पवार, मुंबईचे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त प्रभाकर लोके यांच्या यांच्या उपस्थितीत तालुकाप्रमुख मंगेश लोके यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

*समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो व समाजासाठी आपण काही तरी केले पाहिजे ही तळमळ असलेले खांबाळे गावचे सुपुत्र मंगेश लोके हे गेली 25 वर्षे सातत्याने केंद्र शाळा खांबाळे नं.1 या प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी निश्चितच हे साहित्य उपयोगी पडेल. विद्यार्थ्यांनी विविध परीक्षा मधून आपले नावलौकिक मिळवावे. या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक प्रगती साधुन आई- वडिलांचे आणि या शाळेचे नाव उज्ज्वल करावे असे प्रतिपादन मुंबईचे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त प्रभाकर लोके यांनी केले.*
*शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना तालुका प्रमूख तथा माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या सौजन्याने केंद्रशाळा खांबाळे नं.1 या प्रशालेतील पहिली ते सातवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक छत्री व शैक्षणिक साहित्याचे वाटप खांबाळे गावच्या सरपंच गौरी पवार, मुंबईचे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त प्रभाकर लोके, शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या प्रमूख उपस्थितीत करण्यात आले.*
*यावेळी उपसरपंच गणेश पवार, माजी सरपंच विठोबा सुतार, ग्रा.पं.सदस्य अमोल चव्हाण, रसिका पवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष मंगेश कांबळे, शिवसैनिक दीपक पवार, जयेश पवार,सूर्यकांत सुतार, संकेश पवार,विलास मोहिते, गणेश सदाशिव पवार, रामचंद्र पवार, सुनिल गुरव, सतीश पवार, अक्षय पवार, समीर पवार, मुकेश पवार,वृषाली पवार, प्रियंका पवार, श्रद्धा पवार, पूजा देसाई, मनस्वी पवार, गायत्री पवार, वृषाली गणेश पवार, आर्या पवार, अंजली पवार, अक्षता कांबळे, किशोरी सुतार, योगीता पवार, सूचिता साळुंखे, रिद्धी साळुंखे, वैष्णवी साळुंखे, सुजाता परब, सिद्धी सुतार, सुप्रिया पवार, लता पवार, मानसी पवार, शुभांगी सुभाष पवार, शिक्षक वृंद व पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.*
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश कांबळे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक शेट्ये मॅडम यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!