*कोकण Express*
*माणगाव खोऱ्यातील माजी जि प सदस्य राजू कविटकर यांच्या पाठपुराव्याला यश*
माणगाव खोऱ्यातील माजी जि प सदस्य राजू कविटकर यांच्या सततच्या प्रयत्नामुळे आणि पाठपुराव्यामुळे गोवा बांबुळी रुग्णालयात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे त्यामुळे जिल्ह्यातून उपचारासाठी जाणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय दूर झाली आहे स्थानिक कर्मचारी असल्याने तिथे लागणारी सुविधा त्यांच्यामार्फत मिळण्यास हातभार लागणार आहे यासाठी कविटकर यांनी सातत्याने जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करून पत्रव्यवहार केला होता खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलीपे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर गोवा बांबुळी येथे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने आरोग्य कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे त्यामुळे गैरसोय दूर झाले आहे कर्मचारी नियुक्त केल्याने राजू कविटकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन खास अभिनंदन केले।