कणकवलीतील जीवन स्त्रोत संस्थेकडून राबविला उपक्रम

कणकवलीतील जीवन स्त्रोत संस्थेकडून राबविला उपक्रम

*कोकण Express*

*कणकवलीतील जीवन स्त्रोत संस्थेकडून राबविला उपक्रम*

*कष्टकरी महिलांच्या मुलींना मोफत वह्या वाटप ; विद्यार्थिनींना अनेक विविध विषयांवर मार्गदर्शन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

जीवन स्त्रोत सेवा संस्थेच्या वतीने शेतकरी , मजूर, उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला, आशा सेविका यांच्या 10 वी 12 वी उत्तीर्ण मुलींना वह्या वाटप करण्यात आले. संस्थेच्या वतीने गेली चार वर्षे सातत्याने हा उपक्रम राबविला जात आहे. कणकवली येथे हा उपक्रम संपन्न झाला. या साठी कणकवली तालुक्यातील वेगवेगळ्या भागातील अनेक विद्यार्थिनी उपस्थित होत्या . कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करुन व जिजावू आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. संस्थेच्या सदस्या सौ.मृण्मयी जाधव यांनी संस्थेची वाटचाल आणि राबवले जाणारे विविध उपक्रम याबाबत माहिती सांगितली.संस्थेच्या अध्यक्षा सौ शितल मांजरेकर यांनी व्यक्तिमत्त्व विकास यावर मार्गदर्शन केले. ज्या मुलींची आर्थिक परिस्थिती नाही अशा मुलींसाठी त्या घेत असलेल्या मोफत beauty parlour आणि फॅशन डिझायनर प्रशिक्षण याबाबत माहिती सांगितली. तसेच संजना घाडी व करीना चव्हाण या दोन विद्यार्थिनींची मोफत फॅशन डिझायनर प्रशिक्षण साठी निवड करण्यात आली. संस्थेच्या सदस्या सौ मुग्धा आचार्य यांनी कोणत्याही प्रकारच्या त्रास किंवा मुलींना होत असलेली छेडछाड या बाबत कायदेशीर तरतुदी याबाबत मार्गदर्शन केले.ग्रामसेविका संगीता पाटील यांनी करियर वर फोकस कसा करावा यावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी सिध्दी परब, सुश्मिता बावदाने, कल्पना मसुरकर , परवीन शेख , आरती वायंगणकर ,सलोनी चाळके, दीक्षा तेली , कविता मसुरकर, शर्मिला साळगावकर, संयोगिता मुसळे , अर्चना माणगावकर , कविता गवाणकर , शोभा चौकेकर , प्रतीक्षा चौकेकर , प्राजक्ता राणे, जान्हवी भोसले , ज्योती सुलेभावी , अनिता पवार सायली साबळे, रामदास मांजरेकर , तसेच संस्थेच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!