सिंधुदुर्गात ६६ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

सिंधुदुर्गात ६६ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

*कोकण Express*

*सिंधुदुर्गात ६६ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान*

*सिंधुदुर्गात ६६ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान*

*१ लाख ९ हजार १६२ मतदार बजावणार हक्क*

*४ ग्रा.पं. बिनविरोध*

*सिंधुदुर्गनगरी ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७० ग्रामपंचायती पैकी ४ ग्राम पंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे ६६ ग्राम पंचायतींमध्ये ४९४ जागांसाठी प्रत्येक्ष मतदान १५ जानेवारी रोजी होत आहे. यासाठी १ लाख ९ हजार १६२ मतदार निश्चित झाले आहेत. यात महिला मतदार ५४ हजार ५९ तर पुरुष मतदार ५५ हजार १०३ एवढे आहेत. ७० ग्राम पंचायत मधील एकूण ६०० जागांपैकी १०६ सदस्य जागा बिनविरोध झाल्या आहेत. दरम्यान, निवडणूक जाहिर प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी थंडावल्या.
७० ग्राम पंचायतच्या ६०० जागांसाठी १५५० अर्ज दाखल झाले होते. यातील १५ बाद झाले होते. राहिलेल्या १५३५ पैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ३४२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे १०८७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. ६०० पैकी १०६ जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने या जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता ४९४ जागांसाठी प्रत्यक्षात १०८७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. १०८७ उमेदवार २२६ प्रभागात आपले राजकीय नशीब आजमावत आहेत. येथे अटीतटीची लढत होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यातील अनेक ठिकाणी एकास एक या प्रमाणे भाजप विरुद्ध महा विकास आघाडी तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवार मुळे तिरंगी लढत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!