*कोकण Express*
*फोंडाघाट येथे तहसीलदार रमेश पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहण्याची दिली माहिती*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
रविवार दिनांक 23 जुलै रोजी तहसीलदार रमेश पवार यांनी फोंडाघाट येथे नागरिकांच्या शेतात जाऊन पिक पाहणी केली व शेतकऱ्यांना त्याची माहिती दिली तसेच अल्पमुदतीचे कर्ज सोसायटी मार्फत घेणाऱ्या शेतकऱ्यांनी पीक नोंदणी करण्याचे आव्हान तहसीलदार यांनी केले यावेळी मंडल अधिकारी प्रभुदेसाई, तलाठी जैनवार, शिवसेना प्रमुख संजय आग्रे, संदेश पटेल आनंद मर्ये, विजय मुळेकर बबन पवार, सोसायटी सेक्रेटरी प्रसाद देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.