पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या २७ जुलै वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन

पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या २७ जुलै वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन

*कोकण Express*

*ठाकरे गट शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या २७ जुलै वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन*

पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या २७ जुलै या वाढदिनी शिवसेना शाखा कनेडी येथे वृक्ष वाटप करण्यात येणार , तसेच आरोग्य केंद्र कनेडी येथे परिसराची स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे.
शिवसेना विभागीय कार्यालय कनेडी येथे मासिक सभा संपन्न झाली या वेळी पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे नियोजन करुन कार्यक्रम ठरवण्यात आले शिवसेना शाखा कनेडी च्या वतीने राबवण्यात आलेली कामगार कल्याण नोंद व त्याचा आढावा मा सतीशजी सावंत यांनी घेतला यामध्ये सुमारे २५० लोकांचे कामगार कल्याण फार्म भरण्यात आले तसेच सुमारे ५५ जणांचे मतदार नोंदणी अर्ज भरण्यात आले असे तालुका प्रमुख प्रथमेश सावंत यांच्या तर्फे सांगण्यात आले
सतीशजी सावंत यांच्या मार्फत कार्यकर्त्यांना पीक विमा तसेच ३१ जुलै पर्यंत ई पीक पाणी चे महत्व लोकापर्यंत पोहचवा व त्याचेही फार्म येत्या रविवार पासून दर रविवारी पीक विमा लोकांचा काढा त्याचा विम्याची रक्कम शाखे तर्फे भरण्यात येईल अशीही सूचना केली
नवनियुक्त युवासेना उप जिल्हा प्रमुख मुकेश सावंत यांचा सतीशजी सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
या वेळी उपस्थित तालुका प्रमुख प्रथमेश सावंत , अल्पसंख्याक ऊप जिल्हाप्रमुख बेनी डिसोझा , युवासेन तालुका प्रमुख उत्तम लोके , कुंभवडे सरपंच सौ विजया कानडे , युवासेन समन्वयक गुरु पेडणेकर , विभाग प्रमुख आनंद आचरेकर , विभाग प्रमुख मंगेश सावंत , उपविभाग प्रमुख श्याम परब , आप्पा तावडे , पद्माकर पंगम, सचिन सावंत, रमा गावकर, सौ अंजली सापळे , सांगावे ग्राम पंचायत सदस्य सौ जयश्री सावंत , सौ सुजाता सावंत , संतोष सावंत , अरविंद सावंत, बावतीश घोनसालवीस, कुणाल सावंत , गणेश शिवडावकर, संजय सावंत , लावू पवार , तुषार गावकर , संदीप गावकर, दया जाधव, अंगुली कांबळे, अर्जुन कांबळे , सतीश परब , आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!