तळेरे येथे मंगळवारी रक्तदान शिबिर : सहभागाचे आवाहन

तळेरे येथे मंगळवारी रक्तदान शिबिर : सहभागाचे आवाहन

*कोकण Express*

*तळेरे येथे मंगळवारी रक्तदान शिबिर : सहभागाचे आवाहन*

*कासार्डे : संजय भोसले*

तळेरे येथील स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाच्या वतीने मंगळवारी (ता. 25) सकाळी 9 ते दू. 1 वा. पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी दोनदा रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. याशिवाय अनेक सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, शेती आणि सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात. तर तळेरे पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांनी लक्ष वेधलेल्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाचे अशाही सामाजिक उपक्रमाला नेहमीच सहकार्य असते. मंगळवारी जिल्हा रक्तपेढी यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षी या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. याहीवेळी रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!