शरीर आणि मन यांचा मिलाप करण्याचे योग्य साधन म्हणजे योगाभ्यास होय- विजय वळंजू

शरीर आणि मन यांचा मिलाप करण्याचे योग्य साधन म्हणजे योगाभ्यास होय- विजय वळंजू

*कोकण Express*

*शरीर आणि मन यांचा मिलाप करण्याचे योग्य साधन म्हणजे योगाभ्यास होय- विजय वळंजू*

*कासार्डे : संजय भोसले*

योगासन स्पोर्ट्स असोसिएशन सिंधुदुर्ग च्या वतीने , कणकवली काॅलेज कणकवलीच्या एच .पी. सी. एल. हाॅल मध्ये योगा निवड चाचणी स्पर्धेचे दि. 22 व 23 जुलै 2023 रोजी आयोजन करण्यात आले होते. योगासन जिल्हा निवड चाचणी स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या असून ,या स्पर्धेचे उद्घाटन कणकवली कॉलेजचे सेक्रेटरी विजय वळंजू यांचे शुभ हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी ते म्हणाले की, उत्तम आरोग्यासाठी योगा करण्याची प्रत्येकाच्या जीवनात गरज आहे. तसेच शरीर आणि मन यांचा उत्तम मिलाप करण्याचे साधन म्हणजे योग होय.आणि म्हणूनच योगाचा प्रसार आणि प्रचार संपूर्ण जिल्ह्यात व्हावा. शिवाय ही योगाक्रांती करण्याचं कार्य गेले कित्येक वर्ष ही संस्था करत आहे. ते पूढे म्हणाले की योगासन चाचणी स्पर्धा ही राज्यस्तरीय स्पर्धेची निवड चाचणी असून राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा जिल्हा निवड चाचणी स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत . त्याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेचा शुभारंभ झाला.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपिठावर कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे तसेच कणकवली येथील सुप्रसीद्ध डॉक्टर विद्याधर ताईशेटे. कणकवली कॉलेजचे प्राचार्य युवराज महालिंगे, विद्या मंदिर हायस्कूल कणकवलीचे प्रिन्सिपल पी. जे. कांबळे ,पुढारी सिंधुदुर्ग आवृत्तीचे प्रमुख श्री गणेश जेठे, योगासन स्पोर्ट्स असोसिएशन सिंधुदुर्ग अध्यक्ष सौ वसुधा मोरे, तसेच सेक्रेटरी तुळशीराम रावराणे ,आणि संस्थेचे सदस्य रावजी परब,संजय भोसले, श्वेता गावडे ,डॉक्टर सौ.कोरगावकर ,प्रकाश कोचरेकर , तसेच आरोग्य विस्तार अधिकारी योग शिक्षक रवींद्र पावसकर, परिक्षक आनंद परब ,निता सावंत ,सौ केळुसकर, सौ शिरसाट ,कुमारी तेजल कुडतरकर ,कुमारी प्रियांका सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कणकवली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष समीर नलवडे, डाॅ. विद्याधर तायशेट्ये, विद्यामंदीर हायस्कुलचे मुख्याध्यापक पी.जे.कांबळे इ. नी आपले मनोगत व्यक्त केले. असोसिएशन चे सेक्रेटरी डाॅ. तुळशीराम रावराणे यानी प्रास्ताविक करून संघटनेचा थोडक्यात आढावा स्पष्ट केला. तर असोसिएशन च्या अध्यक्षा डाॅ. वसुधा मोरे यांनी संघटनेची उद्दीष्टे व वैशिष्टे स्पष्ट करून पस्थितांचे आभार मानले.
या स्पर्धा एकूण पाच गटात व वेग वेगळ्या प्रकारात घेण्यात आल्या .जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असतानाही स्पर्धकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही.दोन दिवस चालणार्‍या या योगा चाचणी स्पर्धेत जिल्ह्यातील दुर्गम भागातून सुद्धा विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!