*कोकण Express*
*संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना जमीन व्यवहारात ब्लॅकमेल करतात, म्हणून पक्ष संपला तरी ठाकरे गप्प.!*
*उबाठा सेनेच्या आमदाराने माहिती दिल्याचा आमदार नितेश राणेंचा गौप्यस्फोट*
*उबाठा पक्ष फुटू नये म्हणून मुख्यमंत्री शिंदेंबद्दल चुकीच्या अफवा पसरवल्या जातात*
*मातोश्री च्या किचन केबिनेटचा व्यक्ती लवकरच शिंदे सेनेत प्रवेश करणार*
*आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
गेल्याच आठवड्यात उबाठा सेनेचा एक आमदार मला आमदार निवास येथे भेटला भेटला. उद्धव ठाकरेंची काही खास कागदपत्रे संजय राजाराम राऊत यांच्याकडे आहेत आणि म्हणूनच उबाठा सेना संपली,पक्ष संपला, कार्यकर्ते,पदाधिकारी पक्ष सोडून जाऊ लागले. तरीही त्या संजय राऊत बद्दल एकही शब्द उद्धव ठाकरे काढत नाहीत. संजय राऊत उद्धव ठाकरे यांना ब्लॅकमेल करत आहे आणि त्यामुळेच त्यांचा अत्याचार पक्षातील पदाधिकाऱ्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना सहन करावा लागतो अशी माहिती आपल्याला उबाठा सेनेच्या आमदाराने दिलेली असा गौप्यस्फोट भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी केला.
कणकवली प्रहार भवन येथे पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले,आज अनेक लोक संजय राऊत यांच्यामुळे पक्ष सोडत आहेत मात्र पक्ष उध्वस्त झाला तरी त्यांना उद्धव ठाकरे काही बोलत नाहीत. आता काय होणार याची चिंता आम्हा सर्वांनाच आहे.असे त्या आमदार ने आपल्याला सांगितले.असे सांगत आमदार नितेश राणे म्हणाले, स्वतःचा उबाठा पक्ष फुटू लागला अनेक आमदार मूळ शिवसेनेत मुख्यमंत्री शिंदे यांच्या समवेत जाऊ लागले हे लक्षात घेऊन संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी शिंदे मुख्यमंत्री राहणार नाही अजित दादा मुख्यमंत्री होतील अशा पद्धतीच्या अफवा पसरवणे सुरू केलेले आहे. उबाठा मधील लोकांचे शिवसेनेत होणारे प्रेवश थांबविण्यासाठी अफवा पसरवून राज्यात आपल्या पक्षाला वाचविण्याचा प्रयत्न केले आहेत.भारतीय जनता पार्टीच्या सर्वच नेत्यांनी याबाबत यापूर्वीच स्पष्टीकरण देत एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री म्हणून कार्यकाल पूर्ण करतील असे सांगितले आहे.
आता कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी ठाकरे सेना फुटणार लवकरच मातोश्री च्या किचन केबिनेटचा चा व्येकती शिंदे सेनेत जी मुळ शिवसेना आहे त्यात प्रवेश करणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे ईरशाळवाडीत गेलेच नाहीत. पायथ्याशीच चार लोकांना जमा करून भाषण करून मागे फिरले. ते फक्त नौटंकी करण्यासाठी तिथे गेले होते. जसा त्याने मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ मिनिटातच दौरा केला.गेल्या आठवड्यात विधान परिषदेत फक्त ४३ मिनिटे बसले.
त्यात २० मिनिटे अजितदादाना भेटून नंतर कड्या लावान्यात गेली. जनतेचे प्रश्न सोडून घेण्यासाठी सभागृहात बसत नाहीत.ते काय जनसेवा करणार असा सवाल ही आमदार नितेश राणे यांनी केला.
चक्की पिसायला जायचे नाही म्हणून भाजप सोबत गेलो असे राष्ट्रवादीच्या आमदाराने सांगितले असे संजय राऊत सांगतात त्या राऊतांची विश्वासार्हता का ? त्यांनी आधी आपले कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यावे.
पेंग्विन ठाकरे ना माहित नसेल खरी मम्मी दिल्लीत बसते. मुख्यमंत्री होते त्यावेळी उद्धव ठाकरे सोनिया गांधींच्या दिल्ली येथे जाऊन दंडवत घालत होते.
उद्धव ठाकरे यांनी पावलोपावली शरणं गती पत्करलेली आहे. ते शब्दाचे पक्के नाहीत अशा शरणांगतीत त्यांची पीएचडी झालेली आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार तेव्हाच आमदारकीचा राजीनामा देणार म्हणून घोषणा केली होती. ती घोषणा कुठे राहिली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शब्दाचे पक्के होते दिलेले शब्द त्यांनी कधीही मागे घेतलेला नाही. ब्रॉडकास्ट वर रश्मी ठाकरे वहिणींची मुलाखत घेतली पाहिजे. जेणेकरून कळेल की कोणी सरकार चालवले.
अमित ठाकरे कधीही टोलनाका फोडायला सांगणार नाहीत . राज ठाकरे यांचे कुटुंब आणि आणि उद्धव ठाकरे यांची कुटुंब जमीन आसमानाचा फरक आहे. कार्यकर्त्यांच्या अतिउत्सहीपणा मुळे असे होते.अमित ठाकरे असे करणार नाही. त्यांच्यात आणि आदित्य यांच्यात फरक आहे.
गाडगीळ समितीच्या अहवालनुसार काही चागल्या आणि काही अडचणीच्या सुद्धा सूचना आहेत. त्या समिती अहवालात साधा रस्ता सुद्धा बनवू शकत नाही. तो अहवाल आधी नाना पटोले,रोहित पवार यांनी वाचवा आणि नंतर बोलावे कोकणच्या विकासाला अडचणी येत असतील तर तो स्वीकारता येणार नाही.
रोहित पवार यांनी आमच्या सोबत नको निधान त्यांच्या पक्षाचे आमदार शेखर निकम सोबत बसावे आणि चर्चा करून यांनी माहिती घ्यावी.असे सूचित केले.