*कोकण Express*
*जांभवडे, भुतवड येथील ९५वर्षीय कै. पुंडलिक (बाबा) यांचे निधन*
कुडाळ तालुक्यातील जांभवडे भुतवड, गांवकर वाडी येथील जुन्या काळातील वारकरी भजनकार,विठ्ठल भक्त कै. पुंडलिक उर्फ बाबा शंकर गांवकर यांचे वयाच्या ९५व्या वर्षी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले.
जांभवडे भुतवड परिसरात ते बाबा म्हणून प्रसिद्ध होते. हाडाचे शेतकरी असलेले बाबा जुन्या काळातील भजनकार होते. या वयातही त्यांची स्मरणशक्ती उत्तम होती आणि स्पष्टपणे गायन करायचे.तसेच शेतीची किरकोळ कामे करायचे.ते अध्यात्माचे
अभ्यासक होते आणि अनेक विषयांचे जाणकार होते. जुन्या चालीरिती, परंपरा याबाबत ते परिसरातील अनेकांना उत्कृष्ट मार्गदर्शन करीत असत. श्री. देव गांगेश्वर जीर्णोद्धार मंडळाचे सुरुवातीपासूनचे क्रियाशील कार्यकर्ते आणि मार्गदर्शक होते. त्यांच्या निधनाने जांभवडे भुतवड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुली, नातवंडे असा परिवार आहे.

