*कोकण Express*
*ग्लोबल असोसिइट्स ला न.पं. मुख्याधिकाऱ्यांचा…*
*ग्लोबल असोसिइट्स ला न.पं. मुख्याधिकाऱ्यांचा दणका*
*भाजी मार्केट बांधकाम थांबवण्याचे आदेश*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आरक्षण क्र २५ मधील भाजी मार्केट इमारतीचे बांधकाम थांबवा अन्यथा कायदेशीर कारवाईचे आदेश कणकवली नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी विकासक ग्लोबल असोसिइट्स ला दिले आहेत.
ग्लोबल असोसिइट्स च्या वतीने शहरातील आरक्षित भूखंड क्र.२५ वरील भाजी मार्केट इमारतीचे बांधकाम सुरू आहे. भाजी मार्केट इमारत बांधून ती नगरपंचायत ला हस्तांतरित करण्यासाठी ची २ वर्षे असलेली मुदत ३० डिसेंबर २०१९ रोजी समाप्त झाली आहे. नगरपंचायत व डेव्हलपर्स ग्लोबल असोसिइट्स यांच्यात झालेल्या करारातील अट क्र २७ नुसार मुदतवाढ देण्याचा निर्णय नगरपंचायत सभागृहाने घ्यायचा आहे. वाढीव मुदतीसाठी ग्लोबल असोसिइट्स ने नोव्हेंबर २०२० मध्ये दिलेल्या प्रस्तावाबाबत नगरपंचायत सभागृहात ४ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या बैठकीत निर्णय झालेला नाही. तरीही मुदतवाढ न घेताच ग्लोबल असोसिट्सने भाजी मार्केट चे पुढील बांधकाम सुरूच ठेवले आहे. नगररचना विभागाने साईट व्हिजिट दरम्यान ही बाब निदर्शनास आली असून बांधकाम थांबवावे अन्यथा महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५४ नुसार कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे.