*कोकण Express*
*दापोली आगारातील बस वेळेवर न मिळत असल्याने विद्यार्थी-विद्यार्थीना फटका*
*दापोली:-दापोली आगारातील बस वेळेवर न मिळत असल्याने ग्रामपंचायत तर्फे वारंवार निवेदन देऊन विद्यार्थी-विद्यार्थीना फटका देखील सहन करावा लागत आहे*
दापोली आगारातील ग्रामीण भागातील फेऱ्या वेळेत न सुटल्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी वर्गाला याचा फटका बसत आहे ग्रामीण भागातील बोंडिवली,कोथळकोंड,टांगर,शिरसोली,वडवली भागातील नागरिक वारंवार मागणी करुन देखील दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे
शालेय शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थी वर्गाला त्रास कमी होण्याकरिता राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय सरचिटणीस श्री.वैभव बहुतूले यांनी मा.श्री.शिवाजी जगताप महाव्यवस्थापक वाहतूक,मा.श्री.श्रीनिवास जोशी उपमहाव्यवस्थापक पुणे व मुंबई प्रदेश यांना निवेदन देऊन शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी वर्गाची गैरसोय दुर करण्याची मागणी केली आहे