*कोकण Express*
*ग्राहक पंचायत राज्य अभ्यास वर्गाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे- प्रा. सुरेश पाटील*
ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेची कणकवली तालुका कार्यकारणीची सभा नुकतीच संपन्न झाली . कणकवली येथे आयोजित या सभेमध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य अभ्यास वर्ग 2023 या 5-6 ऑगस्ट रोजी जळगाव येथे होणाऱ्या अभ्यास वर्गाबाबत चर्चा करण्यात आली . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त सभासदांनी या अभ्यास वर्गाला उपस्थित राहावे असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील यांनी केले .
या सभेमध्ये कणकवली तालुकाच्या नूतन कार्यकारणीला अंतिम स्वरूप देण्यात आले . नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे .
अध्यक्ष – श्रध्दा कदम , उपाध्यक्ष – गितांजली कामत , संघटक – चंद्रकांत चव्हाण , सहसंघटक – शीतल मांजरेकर आणि सुभाष राणे ,
सचिव- पूजा प्रकाश सावंत ,
सहसचिव – विनायक सुरेश पाताडे ,
कोषाध्यक्ष – आयेशा निरसो सय्यद,
प्रसिध्दी प्रमुख – विजय गांवकर ,
सदस्य- अनिल चव्हाण , श्रध्दा पाटकर
सल्लागार – अशोक करंबेळकर ,
मनोहर पालयेकर . जिल्ह्यातील जास्तीत जास्त सजग ग्राहकांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे सदस्यत्व स्वीकारावे , असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या मार्फत करण्यात आले आहे .