ग्रस्त आणि दक्ष महिला पोलिसही साखर झोपेत व्यस्त* -भाई चव्हाण

ग्रस्त आणि दक्ष महिला पोलिसही साखर झोपेत व्यस्त* -भाई चव्हाण

*कोकण Express*

*ग्रस्त आणि दक्ष महिला पोलिसही साखर झोपेत व्यस्त* -भाई चव्हाण*

*कणकवली ः प्रतिनिधी*

एके काळी मुलांनी झोपावे म्हणून ‘पोलिसां’ चा धाक दाखविला जायचा. तद्नंतर झोप नाही तर ‘शोले’ चित्रपटातील ‘गब्बर’ अर्थात अमजद खानचा धाक आया मुलांना दाखवायच्या. पण महाराष्ट्रातील पोलिस खाते सद्या एवढे सकारात्मक झाले आहे की, भर साखर झोपेतही ग्रस्त घालता घालता दक्ष रहाणार्या महिला पोलिसही पुरुष पोलिसांसमवेत व्यस्त होऊन रात्री अपरात्री गुन्हेगारांच्या शोधात वणवण फिरत असल्याचा अनुभव नुकताच आपल्याला आला, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

गेल्या काही वर्षांत सिंधुदुर्ग जिल्हात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. सामान्य जनताही हैराण झाली आहे. पोलिसांच्या नावाने बोटे मोडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हातील अपुरी पोलिस यंत्रणा सुद्धा दक्ष झाली असून रात्री अपरात्री ग्रस्त घालत आहे, असे सांगून चव्हाण म्हणाले, चारच दिवसांपूर्वी पहाटे आमच्या घरी आम्ही साखर झोपेत असताना दारावरची बेल- घंटा वाजली. पहाटचे साडेतीन वाजण्याच्या दरम्यानची ही घटना आहे. आम्ही कुटुंबिय साखर झोपेत होतो. मुलगा अभय आणि सून संचिता जागी झाली. घराबाहेर पोलिस उभे होते. त्या दोघांनी चौकशी केली. एका गुन्हेगाराचे भ्रमरध्वनी लोकेशन या परिसरात आम्हाला आढळले आहे. म्हणून आम्ही तपास करीत आहोत. आमच्या अगदी नवीन भाडोत्रीची चौकशी केली. पण त्यांना हव्या त्या गुन्हेगाराचा माग लागला नाही. दरम्यान आम्ही उभयताही जागे झालोत आणि आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला.

एक महिला पोलिस आमच्या सर्वांसह भाडोत्र्यांची चौकशी करु लागली.‌ आम्हाला त्या महिला पोलिसाचे कौतुक वाटायला लागले. रात्री-अपरात्री अशा महिला पोलिसही सतर्क राहून ग्रस्त घालताना दक्ष राहून व्यस्त रहात असल्याचे पाहून त्यांचा अभिमान वाटला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!