*कोकण Express*
*कणकवली शहरातील पटवर्धन चौकाने अखेर मोकळा श्वास घेतला*
*ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने वाहतूक पोलिस विनोद चव्हाण यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार*
*कासार्डे : संजय भोसले*
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन व कणकवली पटवर्धन चौक येथील रिक्षा चालक यांच्या वतीने वाहतूक पोलिस विनोद चव्हाण यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कणकवली शहरातील पटवर्धन चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाड्या पार्किंग केल्या जात होत्या.त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत होता.तसेच अपघाताचा धोका निर्माण झाला होता.यासाठी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने कणकवली पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले होते.परंतु त्याबाबत काहीच कारवाई करण्यात येत नव्हती.कणकवली पोलीस स्टेशनचे नूतन पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून देताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिस विनोद चव्हाण यांनी पटवर्धन चौकात रस्त्यावरतीच करण्यात येणारे पार्किंग व वाहतूक कोंडी बंद केली. त्यामुळे शहरातील पटवर्धन चौकाने मोकळा श्वास घेतला आहे.
या उत्तम कामगिरी बद्दल ह्युमन राईट असोसिएशन प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, कणकवली तालुका कार्याध्यक्ष हनिफभाई पीरखान, अध्यक्ष सौ.संजना सदडेकर, सचिव मनोज वारे, उपाध्यक्ष सदाशिव राणे, सदस्य भरत तळवडेकर तसेच रिक्षा चालक मोहन सावंत, गजानन लाड,गुरव,अमर सावंत,भोगले, सावंत,राणे, होमगार्ड सुमित वारंग, प्रसन्न सकपाळ यांच्या उपस्थितीत वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

