रिक्षाचालकांना स्वतंत्र स्टॅन्ड देण्यासाठी आपण प्रयत्नशील

रिक्षाचालकांना स्वतंत्र स्टॅन्ड देण्यासाठी आपण प्रयत्नशील

*कोकण Express*

*रिक्षाचालकांना स्वतंत्र स्टॅन्ड देण्यासाठी आपण प्रयत्नशील*

*कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात कणकवली शहरातील रिक्षा स्टँड गेल्याने शहरातील रिक्षावाल्यांची अडचण निर्माण झाली, याची कल्पना आपल्याला आहे.त्यामुळे शहरातील रिक्षाचालकांना स्वतंत्र स्टॅन्ड देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.मात्र यासाठी रिक्षाचालकांनी आपल्याशी संपर्क साधायला हवा अशी ग्वाही कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरी करण्यात कणकवली एसटी स्टँड समोरील रिक्षा स्टँड गेल्याने शहरातील रिक्षा व्यावसायिकांसमोर रिक्षा कुठे लावावी? अशी समस्या निर्माण झाली.त्यामुळे कणकवली एसटी स्टँड समोरील उड्डाणपुलाखाली रिक्षा स्टॅन्डसाठी अधिकृतपणे जागा उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील रिक्षा व्यवसायिकांनी बुधवारी जिल्हाधिकारी भवनाच्या प्रवेशद्वारावर लाक्षणिक उपोषण छेडले. व आपली मागणी मान्य न झाल्यास भविष्यात मोठे आंदोलन उभारू.असा इशाराही दिला. या पार्श्वभूमीवर बोलताना नगराध्यक्ष नलावडे यांनी रिक्षा व्यवसाय हा शहरातील जनतेच्या दृष्टीने अत्यावश्यक व्यवसाय आहे. त्यामुळे रिक्षा व्यवसायिकांना आपण आवश्यक ते सर्व सहकार्य करून शहरात त्यांना योग्य त्या ठिकाणी रिक्षा स्टँड देण्यासाठी प्रयत्नशील असणार असे सांगितले.
कणकवली बसस्थानकासमोरील जागा रिक्षा व्यवसायिकांना आरक्षित करून मिळावी यासाठी २०१५ पासून जिल्हा प्रशासनाकडे रिक्षा व्यवसायिक आणि त्यांच्या संघटनेने मागणी केली आहे. मात्र प्रशासन या मागणीला चालढकल करत असल्याचा आरोप रिक्षा व्यावसायिकांनी केला आहे. त्याचबरोबर रिक्षा व्यवसायिक बसस्थानकासमोरील जागेत रिक्षा लावून गेली वीस वर्ष प्रवाशांना आपल्या रिक्षाव्यवसायाची सेवा देत आहेत. याठिकाणी ४० पेक्षा जास्त रिक्षा व्यवसायिक आहेत. मात्र महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे बसस्थानकासमोरील भागात उड्डाणपूल झाले आहे.त्या पुलाखाली जागा आरक्षित होऊ शकते. त्या जागी व्यतिरिक्त दुसऱ्या ठिकाणी जागा उपलब्ध होणे कठीण आहे.याबाबत कणकवली नगर पंचायतीने यापूर्वीच ना हरकत दाखला दिला आहे. परंतु आरटीओ व जिल्हा प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे. कोणतीही दखल घेत नाही असा आरोप रिक्षा व्यवसायिकांनी केला आहे.मात्र यासंदर्भात या शहरातील प्रथम नागरिक या नात्याने आपण रिक्षा व्यावसायिकांचा सकारात्मक विचार करून त्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नगराध्यक्ष नरवडे यांनी सांगून यासाठी रिक्षा व्यावसायिकांनी आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहनही केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!