वाघेरी जोड रस्त्यासाठी ३० लाखांचा निधी केवळ आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून ; उबाठा सेनेचा फुकाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न

वाघेरी जोड रस्त्यासाठी ३० लाखांचा निधी केवळ आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून ; उबाठा सेनेचा फुकाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न

*कोकण Express*

*वाघेरी जोड रस्त्यासाठी ३० लाखांचा निधी केवळ आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून ; उबाठा सेनेचा फुकाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न*

*माजी सभापती मनोज रावराणेंनी केला यशस्वी पाठपुरावा*

*लोरे शक्तिकेंद्रप्रमुख नरेश गुरव यांचा दावा*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील वाधेरी या गावातील मुख्य रस्ता (वाघेरी जोडरस्ता) कामासाठी ( ३० लाख (1) रुपयांच्या निधीस आमदार निवेशजी राणे यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिलेली आहे. यामुळे वाघेरी वासीयांची समस्या व जनमागणी लक्षात घेऊन कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती तथा भाजप जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे असा दावा लोरे शक्तिकेंद्रप्रमुख नरेश गुरव यांनी केला आहे.

तथापि, सदरच्या कामासाठी ३० लाख रुपयांचा निधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे यांनी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर मंजूर झाल्याचे वृत्त है वाघेरीवासीयांची दिशाभूल करणारे आहे. त्याबाबतचे सबळ लेखी पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत. या कामासोबतच प्रजिमा ६ ला ते घोणसरी खवळे भाटले लोरे मार्ग ग्रा. मा. ११८ या सत्याकरीता (३० लाख) एवढ्या निधीस देखील आमदार नितेशजी राणे यांच्या सूचनेनुसार व मनोज रावराणे यांच्या पाठपुराव्याअंती सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी पक्षाने केलेल्या जनहिताच्या कामांचे फुकटचे श्रेय लाटून सर्वसामान्य जनतेची फसवणूक करण्यापेक्षा प्रत्यक्षात लोकमागणीचा आदर करून जनहिताची कामे करण्यावर लक्ष केंद्रित करावे असा उपरोधिक टोला नरेश गुरव यांनी विरोधकांना लगावला आहे.

तसेच लोरे पंचायत समिती मतदार संघातल्या सदरच्या सर्व मंजूर रस्त्याच्या कामांबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण व आमदार नितेशजी राणे यांचे आभार व्यक्त करतानाच सदरची कामे ही अधिकाधिक उत्कृष्ट दर्जाची होण्यासाठी आपण मनोज रावराणे यांच्या माध्यमातून दक्षतापूर्वक लक्ष देणार असल्याचे देखील नरेश गुरव यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!