*कोकण Express “
*कुणकावण येथील जळीतग्रस्त लक्ष्मण घाडी यांना घाडीगांवकर समाजाची मदत*
दिनांक 5 जुलै रोजी देवगड तालुक्यातील कुणकावण बंदरवाडी येथील लक्ष्मण येसू घाडी यांचे घर आगीच्या भक्षस्थानी पडले . लक्ष्मण घाडी आणि त्यांच्या पत्नी दोघेही कामानिमित्त घराबाहेर असताना उंदराने पेटती वात पळवून नेऊन अन्यत्र टाकल्याने घर आगीच्या भक्षस्थानी पडले . घरातील बहुतेक सर्व सामान या आगीमध्ये भस्मसात झाले . क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज , मुंबईच्या सिंधुदुर्ग विभागाने आपत्कालीन मदत म्हणून लक्ष्मण घाडी यांना घरगुती सामान प्रदान केले . यावेळी क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाजाचे राज्य कार्यकारणी सदस्य विजय गांवकर , सिंधुदुर्ग विभागाचे अध्यक्ष सूर्यकांत घाडी , सचिव प्रदीप घाडी , कार्यकारणी सदस्य अर्जुन बापार्डेकर, मध्य मुंबई विभागाचे माजी अध्यक्ष सदा घाडीगांवकर , जळीतग्रस्त घरमालक लक्ष्मण घाडी विनोद घाडी तथा राहुल घाडी ,आदी उपस्थित होते .