*कोकण Express*
*तळेरे येथे मधुसूदन नानिवडेकर यांचा द्वितीय स्मृतिदिन*
*कासार्डे : संजय भोसले*
तळेरे येथील स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्व. सुनील तळेकर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचा द्वितीय स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी वाचनालय व ट्रस्टचे पदाधिकारी, कर्मचारी आणि वाचक उपस्थित होते.
प्रसिध्द गझलकार मधुसूदन नानिवडेकर हे शेवटची 4 वर्षे तळेरे येथे वास्तव्यास होते. आणि त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक साहित्यिक कार्यक्रम पार पडलेत. त्यांच्याच संकल्पनेतून तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाची स्थापना झाली. त्यामुळे त्यांचे तळेरे गावाशी वेगळे नाते निर्माण झाले होते.
त्यांच्या या स्मृतींची आठवण म्हणून स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्व. सुनील तळेकर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने द्वितीय स्मृतिदिनी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, विश्वस्त चंद्रकांत तळेकर, वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर, सचिव मिनेश तळेकर, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, माजी सरपंच शशांक तळेकर, एज्युकेशनल एडव्हायजर सदाशिव पांचाळ, ध्रुव बांदिवडेकर आदी उपस्थित होते.