*कोकण Express*
*सेवानिवृत्त शिक्षकांना शाळेत हजर करून घेण्यास कासार्डे ग्रामस्थांचा विरोध*
*शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत मार्फत गटशिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदन सादर*
*कासार्डे : संजय भोसले*
सेवानिवृत्त शिक्षकांना जि.प.शाळेत नेमणूक करण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून आल्यानतंर जि.प. सिंधुदुर्गच्या वतीने इच्छुक उमेदवारांची नेमणूका करण्यात आल्या याअंतर्गत जि.प. केंद्रशाळा नं. 1 व जि.प.शाळा कासार्डे बौध्दवाडी येथे सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. यामुळे शाळेतील सध्या कार्यरत असणारे शिक्षक जाणार असल्याने व सध्या बेरोजगार असणारे डी.एड.,बी.एड. उमेदवार असताना अशा सेवानिवृत्त शिक्षकांना शाळेत हजर न करत थेट शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत मार्फत लेखी पत्र गटशिक्षणाधिकारी याना निवेदन देत विरोध दर्शवला.
यावेळी कणकवली पंचायत समिती येथे भेट देत माजी तंटामुक्त अध्यक्ष तथा, शाळा व्यवस्थापन समिती बौद्धवाडी सदस्य संतोष सावंत,भाऊ जाधव,केंद्र शाळा कासार्डे नंबर १चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गुरुप्रसाद सावंत, उपाध्यक्ष प्रमोद शेटये,रवि जाधव,जिवदास जाधव, मंगेश रहाटे, मंगेश सावंत, विजय कदम,विजय राणे, आण्णा खाडये,उमेश पांचाळ,गोपाळ पांचाळ,आदी पालक व ग्रामस्थांकडून गटशिक्षण अधिकारी कार्यालयात निवेदन दिले.
दरम्यान सेवानिवृत्त शिक्षकांचे वय झाल्याने त्याना शासनाकडून निवृत्त केले असताना असा घाट का घातला जातोय असा प्रश्न पडत असून जिल्हातील अनेक शाळा दुर्गम भागात आहेत त्याठिकाणी जाताना अशा शिक्षकांची दमछाक होते. तसेच सध्या डी.एड,बी.एड. भरती प्रक्रिया न झाल्याने अनेक बेरोजगारांना या नेमणूक कायम कंत्राटी पद्धतीवर नेमणूक केल्यास त्याना रोजगार मिळवून बेरोजगारी कमी होईल. यासाठी जिल्हाचे सुपूत्र असणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे, शिक्षण मंत्री दिपक केसरकर,खासदार विनायक आमदार नितेश राणे,आमदार वैभव नाईक यानी लक्ष घालावे असे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष गुरूप्रसाद सावंत यानी केले असून जिल्हातील डी.एड., बी.एड. बेरोजगारांना याअंती सेवानिवृत्त शिक्षकांना विरोध करून तात्पुरता न्याय जिल्हातील बेरोजगार युवकांना द्यावा अशी मागणी केली