भाविका भरणकर,तेजस तेलीचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

भाविका भरणकर,तेजस तेलीचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

*कोकण Express*

*भाविका भरणकर,तेजस तेलीचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश*

*जि.प.पूर्ण प्राथ.घोणसरी नंबर ५ शाळेचा, मान्यवरांकडून गौरव.*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

फोनघाट- घोणसरी नंबर ५ च्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेतील दोन मुलांनी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश प्राप्त केले. यामध्ये भाविका हेमंत भरणकर ( २६२ ) हीने राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीमध्ये सहावे स्थान प्राप्त केले. तर तेजस संतोष तेली (२१२ ) यांनी सर्वसाधारण ग्रामीण गुणवत्ता यादी ४५ वा क्रमांक पटकावला. त्यांना विद्याधर पांडुरंग पाटील या सहशिक्षकांनी मार्गदर्शन केले.तर सौ स्मिता कदम (मुख्याध्यापिका), जयप्रकाश सावंत,सौ. प्रिया गोसावी यांचे सहकार्य मिळाल गटशिक्षणाधिकारी किशोर गवस आणि घोणसरी केंद्रप्रमुख सुभाष मराठे यांचेसह शाळा व्यवस्थापन समितीचे संचालक आणि अध्यक्ष विलास मराठे, माजी सभापती मनोज रावराणे, घोणसरी सरपंच मॅक्सी पिंटो ,तसेच फोंडाघाट सरपंच सौ. संजना आग्रे यांनी शिष्यवृत्तीधारक मुलांचे तसेच शिक्षक वर्ग आणि पालक यांचे सुयशाबद्दल कौतुक करून, प्रोत्साहन दिले. शाळा आणि मुलांचे पंचक्रोशी मध्ये कौतुक होत आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!