माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेचे महाराष्ट्र राज्य उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेचे महाराष्ट्र राज्य उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

*कोकण Express*

*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेचे महाराष्ट्र राज्य उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश*

कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी, बालमंदिर कनेडी या प्रशालेतील विद्यार्थिर्नी कु. कृपा कैलास सावंत या विद्यार्थिनीने महाराष्ट्र राज्य उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२३ मध्ये शिष्यवृत्तीधारक बनण्याचा बहुमान मिळवला आहे. कु. कृपा कैलास सावंत ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५६ गुण मिळवत जिल्ह्यात ६८ क्रमांक मिळवून ग्रामीण शिष्यवृत्ती धारक ठरली आहे.
या सुवर्णमय यशाबद्दल कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्मा. श्री. सतीश जी सावंत साहेब आणि सर्व सन्मा. सदस्य, शालेय समितीचे चेअरमन सन्मा. श्री. आर्. एच्. सावंत व सर्व सन्मा. सदस्य, मा. मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. श्री. सुमंत दळवी पर्यवेक्षक, सन्मा. श्री. बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले व तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कृपा हिला प्रशालेतील शिक्षिका सौ. शिल्पा साटम, श्री. रामचंद्र भानुसे, श्रीम. पल्लवी हाटले, श्री दयानंद कसालकर, श्री मकरंद आपटे, श्री. मंदार मेस्त्री, श्री. प्रसाद मसुरकर, सौ. साधना न्हिवेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!