*कोकण Express*
*जिल्ह्यात भाजप पुरस्कृत ७० पैकी साठ (६०)हून अधिक ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकणार*
*भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
१५ जानेवारी रोजी शुक्रवारी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात भाजप पुरस्कृत ७० पैकी साठ (६०)हून अधिक ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकणार आहे. असा विश्वास आज सावंतवाडी येथे पत्रकार परिषद घेत जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना मला ॲक्टर म्हणणारे आमदार दीपक केसरकर हे खरेखुरे ॲक्टर आहेत त्यांनी विधानसभा निवडणुकांपूर्वी आणि त्यानंतर लोकांना अनेक घोषणा देऊन मतदारांची दिशाभूल केली त्यामुळे लोकच ठरवतील नेमका ॲक्टर कोण असा पलटवार भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केसरकर यांच्या वक्तव्यावर केला.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक सुधीर आडिवरेकर ,आनंद नेवगी ,मोहिनी मडगावकर, आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात भाजप मोठ्या जोमाने वाढत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांगल्या कामाचा निश्चित या निवडणुकीला फायदा होईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी यावेळी व्यक्त केला.