*कोकण Express*
*कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती,सिंधुदुर्ग व लोरे वाघेरी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थाध्यक्ष तुळशीदास रावराणे यांचा वाढदिवस विद्यामंदिर हायस्कूल लोरे वाघेरी प्रशालेत विविध शैक्षणिक उपक्रम जोपासत साजरा करण्यात आला*
याप्रसंगी व्यासपीठावर माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती पंचायत समिती कणकवली संतोष कानडे, सरपंच घोणसरी मॅक्सी पिंटो, माजी सरपंच कोंडये अण्णा तेंडुलकर, माजी सभापती पंचायत समिती कणकवली मनोज रावराणे, सरपंच अजय रावराणे, उपसरपंच सुमन गुरव ,अ.रा.विद्यालय वैभववाडी मुख्याध्यापक नादकर सर, भाई राणे संस्था पदाधिकारी प्रकाश रावराणे, अनमोल रावराणे, सुनील रावराणे, अनंत रावराणे, रघुनाथ रावराणे,संतोष कदम. ग्रामसेवक ऋतुराज कदम, सतीश कासले उपस्थित होते.*
*संस्थेच्या विद्यामंदिर हायस्कूल लोरे- वाघेरी प्रशालेतील विद्यार्थ्यांना याप्रसंगी शैक्षणिक साहित्य व शालेय गणवेशाचे रावराणे साहेब यांच्या माध्यमातून मोफत वाटप करण्यात आले.*
*व्यासपीठावरून बोलताना अनमोल रावराणे यांनी शाळेच्या 23 वर्षाच्या काळात रावराणे साहेब यांनी घेतलेले कष्ट विषद केले.*
*नारकर सर तसेच अण्णा तेंडुलकर यांनी एक मार्गदर्शक म्हणून साहेब यांच्या असलेल्या कार्याप्रती भावना व्यक्त केल्या.*
*संतोष कानडे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत शिक्षणाविषयी असलेली रावराणे साहेब यांची तळमळ व आपल्या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी घेत असलेल्या मेहनतीचे कौतुक केले.*
*मनोज रावराणे यांनी एक मार्गदर्शक म्हणून रावराणे साहेब नेहमीच पाठबळ देतात. त्यांचे विचार, नेतृत्व व दातृत्व गुण आपणासाठी नेहमीच आदर्शवत असल्याचे सांगितले.*
*प्रमुख पाहुणे जयेंद्र रावराणे यांनी आपण यशस्वी होणार यासाठी ध्येय निश्चित केले पाहिजे आणि मनात जिद्द असली पाहिजे. अशी जिद्द असणारा व चिकाटीने सातत्याने पाठपुरावा करून समाजाच्या हिताचं शैक्षणिक व सामाजिक काम करणार एक मनमिळावू नेतृत्व असा उल्लेख करत गेली 23 वर्ष विनाअनुदान तत्वावर संस्थेच्या माध्यमातून शाळा चालवताना घेतलेले कष्ट व मेहनत याचा उहापोह आपल्या वक्तृत्वातून केला जिद्दीच्या जोरावर सतत पाठपुरावा करून शाळेला अंशतः अनुदानित केलं. विद्यार्थ्यांनी देखील अभ्यासात अशी जिद्द जोपासली पाहिजे व सातत्यपूर्ण अभ्यास करून प्रशालेचे नाव उज्वल केले पाहिजे असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रम प्रसंगी रावराणे साहेब यांनी वाढदिवसाच औचित्य साधत शुभेच्छा दिल्या त्या सर्व मान्यवरांचे विद्यार्थी, पालक ,ग्रामस्थ यांचे आभार मानले आपल्या हातून असंच शैक्षणिक व सामाजिक काम होत राहो आणि ते होण्यास आपणा सर्वांच्या शुभेच्छा निश्चितच पाठबळ देणाऱ्या राहोत अशी अपेक्षा व्यक्त केली.

