*कोकण Express*
*कुडाळात तलाठी भरती मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फ़ुर्त प्रतिसाद*
*विद्यार्थ्यांनी तलाठी भरती परीक्षेमध्ये कठोर परिश्रम घेऊन उज्वल भविष्य घडवावे- आ. वैभव नाईक*
*कुडाळ नगराध्यक्षा अक्षता खटावकर यांच्या हस्ते शिबीराचे उदघाटन*
*आ. वैभव नाईक यांच्या पुढाकारातून तसेच विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल-कणकवली व अरुण नरके फौडेशन कोल्हापूर यांचे आयोजन*
अनेक शासकीय भरती परीक्षा होऊ घातल्या आहेत.त्यामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी भरती झाले पाहिजेत येथील विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली पाहिजे.त्याच अनुषंगाने तलाठी भरती परीक्षा पूर्वतयारी मार्गदर्शन शिबीर घेतले आहे.विद्यार्थ्यांना लागेल ते सहकार्य आपण करणार आहोत.या मार्गदर्शन वर्गाचा पूर्ण लाभ घेऊन विद्यार्थ्यांनीही मेहनत घेतली पाहिजे. १० वी १२ वी परीक्षेत आपले विद्यार्थी राज्यात प्रथम येत आहेत. मात्र स्पर्धा परीक्षेत मागे पडत होते परंतु आता ते चित्र बदलत आहे. आपली कुटुंबिक स्थिती गरीबीची आहे. अनेक अडचणी आहेत परंतु त्यातून आपल्याला मार्ग काढून तलाठी व अन्य परीक्षांमध्ये कठोर परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांनी आपले उज्वल भविष्य घडविले पाहिजे.असे प्रतिपादन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केले.
आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकारातून तसेच विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल-कणकवली व अरुण नरके फौडेशन कोल्हापूर यांच्या वतीने तलाठी भरती परीक्षा पूर्वतयारी शिबिराचे उदघाटन आज कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे कुडाळ नगराध्यक्षा अक्षता खटावकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून पार पडले. या कार्यक्रमास आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट,उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिराला तलाठी भरती परीक्षेस उतरणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्स्फ़ुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी नगराध्यक्ष सौ.खटावकर यांनी या शिबीराचा मुलांनी चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा व तलाठी बनावे असे आवाहन केले.
यावेळी अमित सामंत म्हणाले की, आ. वैभव नाईक यांनी घेतलेल्या स्पर्धा परिक्षेच्या शिबीरासाठी विद्यार्थ्यांची जी मोठी उपस्थिती दिसत आहे, ते पाहुन समाधान वाटत आहे. पालकही जागरूक झाले असल्याने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत उतरण्यास पाठींबा देत आहेत. त्यामुळे मुलांनी या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनचा लाभ घेवून तलाठी स्पर्धा परिक्षेत उज्वल यश मिळवावे असे आवाहन केले.
अभय शिरसाट म्हणाले की, यापुर्वी सुद्धा असेच अनेक उपक्रम आ.नाईक यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात राबविण्यात आले. आजच्या या शिबिराचा चांगला उपयोग करून मुलांनी यश संपादन करावे असे आवाहन केले.
अतुल बंगे म्हणाले की,सर्वच श्रेत्रात आ.नाईक पुढे असतात पण आमच्या मुलांच्या पदरी कायमच निराशा दिसते याचे कारण म्हणजे आपल्या मुलांना स्पर्धा परिक्षासाठी चांगले मार्गदर्शन मिळत नाही पण आम. वैभव नाईक यांच्या पुढाकाराने मुलांची ती अडचणही कोल्हापुर, पुणे, मुंबई येथील चांगले प्रशिक्षक आणुन दुर करण्यात येत आहे. त्यामुळे आता होणार्या तलाठी भरतीत आपल्या जिल्ह्यातील मुलांना यश मिळेल असा विश्वास श्री. बंगे यांनी व्यक्त केला. यावेळी अमरसेन सावंत, प्रा. मंदार सावंत यांनीही मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. .
यावेळी शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे,युवक कल्याण संघाचे खजिनदार प्रा. मंदार सावंत, जयभारत पालव,कृष्णा धुरी,संतोष शिरसाट,नगरसेवक उदय मांजरेकर,माजी नगराध्यक्ष आफरीन करोल,रूपेश पावसकर,नगरसेविका श्रेया गवंडे, सई काळप, श्रृती वर्दम,ज्योती जळवी, गंगाराम सडवेलकर,राजु गवंडे,अरुण नरके फौडेशन कोल्हापूरचे प्रशिक्षक प्रा. जाधव,प्रा.कामत आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे निवेदन व आभार बबन बोभाटे यांनी मानले