*कोकण Express*
*मुंबई गोवा महामार्गवरील ओव्हर ब्रीज खाली गंदगीचे साम्राज्य.नागरिक त्रस्त*
*ठेकेदार व प्राधिकरणाने यात लक्ष घालून ही समस्या मार्गी लावावी यासाठी कासार्डे ग्रामस्थ आक्रमक*
*कासार्डे : संजय भोसले*
मौजे कासार्डे तिठ्ठा व हद्दीत मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर कासार्डे तिठ्ठा ओव्हर ब्रीज झाले मात्र ब्रीज खालील भागात आजही कामे अपूर्ण आहेत. तरी याकडे गांभीर्याने ठेकेदार कंपनी व हायवे प्राधिकरण यानी लक्ष घालून तातडीने मार्गी लागवेत अशी मागणी स्थानिकांसह नागरिकांकडून होत आहे.
कासार्डे तिठ्ठा व परीसर हा भाग नेहमीच गजबजलेला असतो. या ठिकाणी तळेरे, विजयदुर्ग,फोंडाघाट, कणकवलीकडून येणारी वाहने नेहमीच येजा करत असतात सध्यस्थितीत ब्रीज वरून पडणा-या पाण्याची पाईपलाईन अपूर्ण असल्यामुळे ब्रीज खालील दोनी भागात पाण्याच्या गळतीमुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे.सध्या या ठिकाणी पाणी साचून चिखलमय झाल्याने दुर्गंधी निर्माण होत असल्याने ब्रीज खालील भागात पर्याय म्हणून डांबरीकरण किंवा पेवर बाॅल्क बसविण्यासाठी ठेकेदार कंपनी व हायवे प्राधिकरणकडे मागणी केली जात आहे.
तसेच आजही कासार्डे हद्दीत काही ठिकाणी अपूर्ण भूसंपादन, सर्व्हीस रोड व ड्रेनेजची लाईनची कामे अपूर्ण असल्याने सांडपाण्याची योग्य निचरा होत नसल्याने सखल भागात पाणी साचत असल्याने यावरही तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरत असून तातडीने कार्यवाही करावी अन्यथा वाहनचालक व स्थानिकांकडून आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा स्थानिक ग्रा.पं.सदस्य सहदेव उर्फ आण्णा खाडये यानी दिला आहे.