पोलीस निरीक्षक अतुल जाधव वेंगुर्ला पोलीस ठाणे यांची उल्लेखनीय कामगिरी

पोलीस निरीक्षक अतुल जाधव वेंगुर्ला पोलीस ठाणे यांची उल्लेखनीय कामगिरी

*कोकण Express 

*पोलीस निरीक्षक अतुल जाधव वेंगुर्ला पोलीस ठाणे यांची उल्लेखनीय कामगिरी*

*पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार रंजिता चौहान यांची कौतुकास्पद कामगिरी*

मागील पाच वर्षात महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचार संदर्भात वेंगुर्ला पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिलेल्या आदेश व सूचनांचे पालन करून वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचेसह मपोहवा/चौहान यांनी वेळोवेळी पीडित महिला व पीडित बालिका यांना भेटी देऊन त्यांची विचारपूस केली त्याचप्रमाणे त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यापैकी वेंगुर्ला पोलीस ठाण्यातील गु.र.नं. 84/2023 भादवी कलम ३७६, सह पॉक्सो या गुन्ह्यातील पीडित बालिका ही 13 वर्षाची असुन तीचे घरातील हालाखीची परिस्थिती लक्षात घेऊन, तिच्यावर झालेल्या अत्याचाराच्या दडपणातून तिला बाहेर काढण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. पीडित बालिका ही सध्या सातवी मध्ये शिक्षण घेत असून शिक्षणासह ती सध्या आपल्या आजारी आई आजी आणि आजोबांचा सांभाळ करत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचेसह पोहवा/वेंगुर्लेकर, मपोना/ शिरोडकर यांनी आज रोजी पीडित बालिकेच्या घरी भेट देऊन तिची आई आजी आजोबा सह पीडित बालिकेची विचारपूस केली. पीडित बालिका ही शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता अतुल जाधव यांनी आपले सर्वतोपरी प्रयत्न सुरू केलेले आहेत. तिची घरची परिस्थिती लक्षात घेऊन पीडित बालीकेस गृहपयोगी वस्तू घेऊन दिल्या. तसेच ती कोणत्याही दडपणाखाली राहू नये व सध्या तिचेवर जी जबाबदारी आलेली आहे, ती जबाबदारी कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी आपल्या कर्तव्यासह केलेले हे सामाजिक कार्य खरोखर उल्लेखनीय आहे. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार रंजिता चौहान यांनी पीडित महिला व बालिका यांच्याशी संपर्क करून त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केलेला आहे. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या कार्याचा सर्वांनी बोध घेतला पाहिजे. आपल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन सामाजिक कार्य तत्परतेने करणारे व एक मिळावु अधिकारी वेंगुर्ल्यातील नागरिक प्रथमच बघत आहेत. त्यांच्या ह्या कार्याला सलाम…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!