*कोकण Express*
*सेवानिवृत्त शिक्षकांनी सामाजिक भान ठेवून नियुक्त्या स्विकारु नयेत ; श्री.वामन तर्फे*
*राज्यात डी. एड, बी एड बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत असताना कोणत्याही प्रकारची शिक्षक भरती न करता पळवाट म्हणून दि. ७/७/23च्या शासन आदेशानुसार सेवानिवृत्त शिक्षकांना २००००₹मानधनावर सेवेत घेण्याचे ठरविले आहे. शिक्षकांच्या वेतनावर जास्त खर्च होत आहे असे वारंवार सांगणाऱ्या शासनाच्या लोकांना शिक्षणसेवक मानधन १६000₹असताना २0000₹मानधनावर सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक करून काय साध्य करायचे आहे? असा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. वामन तर्फे व सचिव श्री. कुसगांवकर सर यांनी विचारला आहे. हे बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळल्या सारखे आहे. सेवानिवृत्त बांधवांनी सामाजिक भान राखावे. केवळ २००००₹मिळणार म्हणून
नियुक्ती स्विकारु नये. विद्यार्थी हीत जोपासावे वाटत असेल तर मोफत सेवा द्यावी. ज्या माध्यमिक-प्राथमिक शिक्षकांनी अर्ज केले आहेत त्यांनी बेकार तरुणांचा विचार करावा . असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री वामन तर्फे आणि सचिव श्री. गुरूदास कुसगांवकर यांनी केले आहे.