क्रीडा क्षेत्रात वैभववाडी पॅटर्न तयार करणारा क्रीडा शिक्षक: बयाजी बुराण

क्रीडा क्षेत्रात वैभववाडी पॅटर्न तयार करणारा क्रीडा शिक्षक: बयाजी बुराण

*कोकण Express*

*क्रीडा क्षेत्रात वैभववाडी पॅटर्न तयार करणारा क्रीडा शिक्षक: बयाजी बुराण*

*क्रीडा शिक्षक महासंघातर्फे तुकाराम देवकर यांचा सदिच्छा सत्कार*

*कासार्डे : संजय भोसले*

वैभववाडी तालुक्यात क्रीडा चळवळ निर्माण करणारे तसेच जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात वैभववाडी पॅटर्न निर्माण करणारा शिक्षक म्हणून आणि छोट्याशा वैभववाडी तालुक्याचा झेंडा वेगवेगळ्या खेळातून रोवण्याचे काम देवकर सरांनी केल्याचे असे गौरवोद्गार शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बयाजी बुराण यांनी वैभववाडी येथे काढले.
आचिर्णे हायस्कूलचे क्रीडा शिक्षक तुकाराम देवकर यांची अहमदनगर रयत शिक्षण संस्थेत बदली झाल्याने शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ वैभववाडी व शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने देवकर यांच्या निवासस्थानी आयोजित सदिच्छा कार्यक्रमात जिल्हा अध्यक्ष बयाजी बुराण बोलत होते.
याप्रसंगी आ.रा.विद्यालय वैभववाडीचे मुख्याध्यापक शरद नारकर, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य समन्वयक तथा कासार्डे हायस्कूलचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड, सत्कारमूर्ती तुकाराम देवकर,वैभववाडी क्रीडा शिक्षक महासंघाचे तालुका अध्यक्ष तथा आ.रा. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक संदेश तुळसनकर , क्रीडा शिक्षक महासंघाचे पदाधिकारी व क्रीडा शिक्षक रामचंद्र घावरे,एन.बी.जाधव,
एन.ए.जमादार,एस.आर.
पाटील, संजय आडे, शंकर वाघमोडे,निवास जाधव शिवप्रसाद देवकर,व सौ.देवकर व वैभववाडी तालुक्यातील बहुतांश क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापक शरद नारकर म्हणाले की, उत्कृष्ट तालुका क्रीडा समन्वयक व विद्यार्थीप्रिय क्रीडा शिक्षक म्हणून तूकाराम देवकर सरांनी गेली १४ वर्षे आचिर्णे हायस्कूल काम करताना क्रीडा क्षेत्रातून तालुका जोडण्याचे भरीव काम केल्याचे गौरवोद्गार काढून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राज्य समन्वयक दत्तात्रय मारकड यांनीही याप्रसंगी शुभेच्छा देताना तुकाराम देवकर सरांनी तालुका एकसंघ करून तालुक्यातील खेळाडूंना उत्कृष्ट प्रोत्साहन देण्याचे काम करणारा शिक्षक म्हणजे देवकर सर अशा शब्दांत गौरवोद्गार काढले.
दरम्यान शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघातर्फे आचिर्णे हायस्कूल क्रीडा शिक्षक तुकाराम देवकर बदली झाल्याने त्यांचा जिल्हा अध्यक्ष बयाजी बुराण,शरद नादकर व दत्तात्रय मारकड यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्ती तुकाराम देवकर सत्काराला उत्तर देताना
म्हणाले की,मला सिंधुदुर्ग जिल्ह्याने मान, सन्मान तर दिलाच याशिवाय ब-याच बाबी मला शिकताही आल्या. आचिर्णे गावचे पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचे खुप प्रेम मिळाले.माझ्या यशस्वी वाटचालीमध्ये माजी विद्यार्थीवर्गाचे मोठे योगदान असल्याची प्रांजळ कबुली त्यांनी याप्रसंगी देत.वैभववाडी तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक्या प्रेमरुपी ऋणातुन कधीच मुक्त होऊ शकत नाही असेही सांगत ते याप्रसंगी भाऊक झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर वाघमोडे यांनी केले. उपस्थित सर्वच मान्यवरांनी तुकाराम देवकर यांच्या यशस्वी कार्याचा आढावा घेत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!