*कोकण Express*
*महाराष्ट्र शासनाच्या पत्रकार अधिस्विकृती समितीच्या सदस्यपदी ज्येष्ठ पत्रकार गणेश नाईक यांची निवड झाल्याबद्दल होणार सत्कार*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र शासनाच्या पत्रकार अधिस्विकृती समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सावंतवाडी येथील जेष्ठ पत्रकार गजानन नाईक यांचा सिंधुदुर्ग सोशल मीडियाच्या सेलच्या माध्यमातून उद्या ता 15 ला सकाळी 11 वाजता सत्कार करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम येथील श्री देव नारायण मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे यावेळी भोसले नॉलेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष अच्युत भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, श्रीराम बोअरवेलचे अजित पाटील व शुभम पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी नव्याने निवड करण्यात आलेल्या सोशल मीडिया सेलच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विजय गावकर तर उपाध्यक्ष हेमंत मराठे व अमित खोत यांचाही सत्कार करण्यात येणार आहे यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सोशल मीडियाचे सेलचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर व सचिव रोहन नाईक यांनी केले आहे