सिव्हिल इंजिनियर परीक्षेत अनुज जेठे प्रथम

सिव्हिल इंजिनियर परीक्षेत अनुज जेठे प्रथम

*कोकण Express*

*सिव्हिल इंजिनियर परीक्षेत अनुज जेठे प्रथम*

*एम आय टी एम अभियांत्रिकी कॉलेज चे उल्लेखनीय यश*

*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*

मुंबई विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी सत्र परीक्षेचा सिविल इंजिनिअरिंग विभागाचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटीन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे. अंतिम वर्ष अभियांत्रिकी पदवी परीक्षेत स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील अनुज गणेश जेठे याने 8.19. पॉइंटर इतके गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

शंकर घाडगे याने 8.06 पॉइंटर इतके गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर ओमकार कदम याने 7.19 पॉइंटर गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे .या विद्यार्थ्यांना कॉलेजचे सिविल विभाग प्रमुख तथा एक्साम डीन प्राध्यापक विशाल कुशे आणि त्याचे सहकारी प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल, उपाध्यक्ष विनोद कदम, सचिव नेहा पाल, खजिनदार वृषाली कदम, प्राचार्य सूर्यकांत नवले, अकॅडमिक डीन पुनम कदम, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर राकेश पाल यांनी अभिनंदन केले आहे. सिंधुदुर्ग नगरी जवळील सुकळवाड येथील एम आय टी एम कॉलेजमध्ये दरवर्षी अनेक मुले अभियांत्रिकी पदवी घेत असतात .यावर्षी प्रथम क्रमांक मिळविलेल्या अनुज जेठे या विद्यार्थ्यासह सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!