*कोकण Express*
*कुडाळ तालुक्यातील गोवेरीत अज्ञाताकडुन दोन व्यक्तीवर हल्ला !*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
कुडाळ तालुक्यातील गोवेरी माधववाडी येथील एका घरात घुसून अज्ञात इसमाने हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि. १२) रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून जखमीला उपचारासाठी कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात जाले आहे. दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून कुडाळ पोलिसांना याबाबत माहीती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने गोवरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुडाळ तालुक्यातील गोवेरी माधववाडी येथील एका घरात एक अनोळखी व्यक्ती घुसला.. त्याने त्या घरातील लोकांशी हुज्जत घालून हातातून आणलेल्या धारदार हत्याराने एका व्यक्तीवर हल्ला केला. यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत त्या हल्लेखोराला ताब्यात घेवून बांधून ठेवत पोलिसांच्या स्वाधीन केले. कुडाळ पोलिसांना याची माहीती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत याबाबत पुढील कार्यवाही सुरू होती, दरम्यान हल्ला का व कशासाठी झाला? हल्लेखोर नेमका कोण? याबाबतची माहीती घेण्याचे काम कुडाळ पोलीस निरीक्षक वृणाल मुल्ला यांच्याकडुन सुरू करण्यात आले होते.