*कोकण Express*
*गद्दारांनी पैशाच्या लालसेपोटी व सत्तेच्या हव्यासापोटी शिवसेना पक्ष पळविण्याचा प्रयत्न केला.. *
संजय पडते पाचशे शिवसैनिकांना ठाकरे शिवसेनेतर्फे मोफत छत्र्यांचे वाटप…
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना कोकणी माणसाने कष्टाने वाढविली. ती संपविण्यासाठी कांहीनी प्रयत्न केले, पण कोकणी माणसाने ती भक्कम करून संपविण्याची भाषा करण्याऱ्यांना संपविले. तळागाळातील माणसांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्याचे काम शिवसेनेने केले. पण काही गद्दारांनी पैशाच्या लालसेपोटी व सत्तेच्या हव्यासापोटी पक्ष पळविण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य झालेले नाही. उध्दव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलेल्या आवाहनानुसार शिवसेना पुन्हा मजबुतीने उभी राहिली. कारण तळागाळातील जनतेसाठी मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेली कामे ही जनहिताची ठरली आहेत. त्या अडीच वर्षाच्या कालावधीत विकासाची कामे तळागाळातील जनतेसमोर कार्यकत्यांनी न्या, भाजपाचा खोटारडेपणाचा झालेला कळस समजावून जनतेला सांगा, अन शिवसेना तळागाळापर्यंत भक्कम करा असे प्रतिपादन उध्दव ठाकरे शिवसेनेच जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी केले.
सुंदर भाटले येथील साईडिलक्स हॉलमध्ये उध्दव ठाकरे शिवसेना पक्षाची मासिक सभा जिल्हाध्यक्ष संजय पडते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या प्रसंगी व्यासपिठावर उपस्थित मान्यवर पदाधिकान्यात सावंतवाडी विधानसभा मतदार संघ प्रमुख शैलेश परब, खासदार विनायक राऊत यांचे चिरंजीव गितेश राऊत, उपजिल्हा प्रमुख प्रकाश गडेकर, तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, तालुका संपर्क प्रमुख भालचंद्र चिपकर, शहर प्रमुख अजित राऊळ, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, माजी नगससेविका सुमन निकम, माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांचा समावेश होता.
यावेळी तालुक्यातील सुमारे 500 पदाधिकाऱ्यांना उध्दव ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे प्रमुख शैलेश परब यांच्या ठाकरे शिवसेनेतर्फे मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे प्रमुख शैलेश परब यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांवर निष्ठा नसलेल्या केवळ सत्तेसाठी व पैशासाठी मनमानीपणे वागणान्या संबंधित आमदारांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरे यांनी अडीच वर्षात केलेल्या कामाची, योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहचवा, आपण जश्या धडाडीने या भागातून शिवसेनेचे आमदार व खासदार निवडून दिले. तोच बाणा राखून खोटी आश्वासने देणाऱ्या भाजपाला धडा शिकवा असे स्पष्ट केले. यावेळी ठाकरे गट शिवसेनेच्यात मासिक सभेत उपस्थित पदाधिकाऱ्यांत मनोहर पैरम, सुमन कामत, विभाग प्रमुख संदिप पेडणेकर, काशिनाथ नार्वेकर, उपतालुका प्रमुख तुकाराम परब, आनंद दाभोलकर, पांडुरंग नाईक, प्रथमेश बांदेकर (शिरोडा). दिगंबर पेडणेकर, अशोक नाईक, सुरेश वराडकर, हेमंत मलबारी, अभि मांजरेकर, गजानन गोलतकर, आनंद बटा, दिलीप राणे, दिगंबर पेडणेकर, नम्रता बोवलेकर, मनाली हळदणकर यांसह तालुक्यातील शिवसेनेचे उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.