*कोकण Express*
*सावंतवाडी तालुका राष्ट्रवादीच्या सरचिटणीस पदी हिदायतुल्ला खान यांची निवड*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
राष्ट्रवादीच्या सावंतवाडी तालुका सरचिटणीस पदी हिदायतुल्ला खान यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात नेते जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले. पक्षाची ध्येय धोरणे सांभाळून पक्ष संघटना वाढीसाठी त्यांनी प्रयत्न करावा, अशा त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
खान हे यापूर्वी राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते होते. व्यापार उद्योग सेलच्या माध्यमातून त्यांनी चांगले काम केले आहे. युवकांची संघटना बांधली आहे. त्याची दखल घेऊन त्यांना तालुक्यावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व राष्ट्रवादी परिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे, व्हिक्टर डान्टस, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.