*कोकण Express*
*कलंबिस्त उपसरपंचपदी भाजपचे नामदेव पास्ते बिनविरोध*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
कलंबिस्त ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंच राजश्री मेस्त्री यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत भाजपचे नामदेव पास्ते यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली. यावेळी माजी सभापती विद्यमान पंचायत समिती सदस्य रविंद्र मडगावकर,माजी जि.प. सदस्य पंढरीनाथ राऊळ, सरपंच शरद नाईक, माजी उपसरपंच राजश्री मेस्त्री, आंतोन रोड्रिग्स, संदेश बिडये, बाळू सावंत, गोट्या सावंत, रवी सावंत, शंकर सावंत,आनंद वर्दम, गजानन पास्ते, संतोष न्हावी, मीनल जंगम, सुप्रिया कलंबीस्तकर, सुजाता सावंत उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक फुंदे यांनी काम पाहिले.