*कोकण Express*
*भाजपची उमेदवारी नाकारली म्हणून कामावरून कमी करण्याचा प्रकार अशोभणीय*
*सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ पाठिशी राहणार:सुजित जाधव*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राजकारण आणि समाजकारण या दोन वेगळ्या बाजू असताना भिरवडे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पक्षाकडून उमेदवारी नाकारली म्हणून कामावरून कमी करण्याचा केलेला प्रकार हा माणुसकीला शोभणारा नाही म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने सुजाता कदम या महिलेने पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याची ग्वाही सुजित जाधव यांनी दिली.
सांगवे येथील मातोश्री वृद्धाश्रमात गेले सात वर्षे काम करणाऱ्या सुजाता कदम या महिलेने भिरवडे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पक्षाकडून उमेदवारी नाकारली म्हणून कामावरून कमी करण्यात आले.हे वृद्धाश्रम माजी मुख्यमंत्री नारायण राणे याचे असल्याने त्यांच्या मर्जीनुसार काम न केल्याने ही कारवाई केल्याचा आरोप सौ.कदम यांनी केला.याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी त्यांच्या निवास्थानी जात भेट घेतली.चर्मकार समाजाच्यावतीने त्यांना आर्थिक मदत देण्यात आली.तसेच अशा अडचणीच्यावेळी समाज म्हणून पाठीशी राहणार असून यापुढे समाजातील कोणत्याही व्यक्तीवर पक्षाकडून उमेदवारी किंवा प्रचारसाठी जबरदस्ती केल्यास जिल्हाध्यक्ष या नात्याने अन्याय झालेल्या व्यक्ती सोबत राहण्याची ग्वाही दिली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हा सदस्य प्रकाश वाघेरकर,तालुका सचिव आनंद जाधव,कमलेश भोसले,सागर चव्हाण आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थीत होते.
यावेळी सौ.कदम यांनी समाज बांधवांचे आभार व्यक्त करताना या वृद्धाश्रमाचे अनाजी सावंत मॅनेजर यांनी नितेश राणे यांच्या संगण्यावरून कामावर येऊ नका असे सांगितले.तसेच 7 वर्ष काम करताना माझ्याकडून चुकीचे कोणतेही काम झाले नाही.फक्त राजकीय गोष्टीमुळे आपल्याला कमी करून आपला संसार मोडकळीस आणण्याचा हा डाव असल्याचे सांगत.घडल्या प्रकाराबद्दल खंत व्यक्त केली.