रुपेश जाधव, पटवर्धन चौकात या परत आपल्या पायाने मागे जाता का पहा

रुपेश जाधव, पटवर्धन चौकात या परत आपल्या पायाने मागे जाता का पहा

*कोकण Express*

*रुपेश जाधव, पटवर्धन चौकात या परत आपल्या पायाने मागे जाता का पहा!*

*राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांचा इशारा*

*चवली पावली गोळा करणाऱ्यांनी आमच्या नेत्यांवर बोलण्याची हिंमत करू नये*

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून काम करणाऱ्या अबिद नाईक यांनी काय केले हे विचारण्याचा अधिकार बाजार बुणग्याना नाही. राष्ट्रवादीत येऊन कार्ड छापत चवली पावली गोळा करनाऱ्यानी आमच्या नेत्यावर बोलण्याची हिंमत करु नये. तुमच्यात खरोखरच हिंमत असेल तर कणकवलीच्या पटवर्धन चौकात येऊन हे वक्तव्य करुन दाखवा मग तुम्ही स्वतःच्या पायांनी चालत जाता का ते पाहू असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा चिटणीस रुपेश जाधव यांना राष्ट्रवादी कणकवली शहर अध्यक्ष इम्रान शेख यांनी दिला आहे.
आमचे नेते अबिद नाईक हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून कार्यरत आहेत. राष्ट्रवादीच्या पडत्या काळात पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी दिल्ली होती. युवकचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जे काम केले ते सर्वज्ञात आहे. त्यावेळी तुम्ही कुठे होता ? दहा ठिकाणी फिरून आल्यानंतर पतीव्रतेचा आव आणणाऱ्यांनी एकदा मागे वळून पहावे म्हणजे स्वतःची लायकी काय आहे ते त्यांना समजेल. अविद नाईक हे राष्ट्रवादी नगरसेवक म्हणून निवडून आले व आजपर्यंत राष्ट्रवादीचे पदाधिकारी म्हणूनच राहिले. ते राष्ट्रवादीचे सदस्य आहेत हे जिल्हाध्यक्षाला माहित नाही हे लपविणेचा खटाटोप करताना आपण काय बोलतोय याचे भान ठेवा. आमच्या नेत्यावर यापुढे अशाप्रकारची टिका केल्यास तुमची सगळी अंडी पिल्ले बाहेर काढू अशा इशाराही श्री. इम्रान शेख यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!