*कोकण Express*
*माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांना बंधू शोक…*
*सचिन नलावडे यांचे निधन…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहरातील रहिवाशी सचिन अनंत नलावडे (५२) यांचे आज रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. सचिन हे आजारी असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, भावजय, पुतणे, असा मोठा परिवार आहे. सचिन यांनी काही वर्ष अलंकार भोजनालय चालवले होते. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे ते मोठे बंधू होत.