कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचा ६९वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचा ६९वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

*कोकण Express*

*कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचा ६९वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न*

कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचा ६९वा वर्धापनदिन, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, नीती आयोग भारत सरकार द्वारा प्राप्त अटल टिंकरिंग लॅबचा उद्घाटन समारंभ व प्रतिथयश मान्यवरांचा सत्कार समारंभ रविवार दिनांक ०९ जुलै २०२३ रोजी उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सन्मा. श्री. वैभवजी नाईक साहेब (आमदार, कुडाळ – मालवण मतदारसंघ) आणि मा. श्री. तुकारामजी रासम साहेब (चार्टर्ड अकाऊंटंट, सुझा रासम आणि कंपनी) लाभले होते. सदर कार्यक्रमाचे कार्यक्रमाध्यक्ष पद सन्मा. श्री. सतीशजी सावंत (अध्यक्ष, क.ग शि.प्र. मंडळ, मुंबई) यांनी भूषविले. सदर कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपणाने झाली. तद्नंतर सन्मा. श्री. वैभवजी नाईक आणि सन्मा. श्री‌. तुकारामजी रासम यांच्या शुभहस्ते नीती आयोग भारत सरकार द्वारा प्राप्त अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमामध्ये इ. १०वी व १२वी परीक्षेमध्ये प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा, संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केलेल्या प्रशालेतील २ विद्यार्थ्यांचा, स्पर्धा परीक्षा तसेच क्रीडा आणि नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री. तुकारामजी रासम साहेब यांनी १० व १२ वी प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५०००/- चे बक्षिस देऊन गौरविले.*

*यानंतर प्रशालेचे माजी विद्यार्थी व प्रतिथयश व्यावसायिक सन्मा. श्री. बाळकृष्ण जगन्नाथ सावंत, श्री. शशांक मुकुंद बेळेकर तसेच श्रीम. निलम कृष्णकांत कदम (कर्तव्यदक्ष पोलिस हवालदार) या प्रतिथयश मान्यवरांचा सत्कार सन्मा. श्री. वैभवजी नाईक आणि श्री. तुकारामजी रासम यांच्या हस्ते करण्यात आला.*

*जीवनात यशस्वी होण्यासाठी चांगला अभ्यास करा. जीवनात कोणीही बना ,पणं जे बनाल ते सर्वोत्तम बना असा मौलिक संदेश प्रमुख पाहुणे सन्मा. श्री. वैभवजी नाईक यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना दिला. तसेच कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेला शाळा विकाससाठी रू. लाख खासदार निधीतून देण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. आपल्याला लाभलेल्या उत्कृष्ट अध्यापकांकडून जास्तीत जास्त ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करा असे आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष सन्मा. श्री. सतीश सावंत यांनी सांगितले.*

*सदर कार्यक्रमाला कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे सर्व पदाधिकारी, शालेय समितीचे सन्मा. खजिनदार व सर्व सदस्य, भिरवंडे सरपंच सौ. सुजाता सावंत, खलांतर – गांधीनगर सरपंच श्री. मंगेश बोभाटे व उपसरपंच श्री. बाळा सावंत, कुंभवडे सरपंच श्री.सूर्यकांत तावडे, हरकुळ बुद्रुक सोसायटी चेअरमन डॉ. श्री. आनंद ठाकूर, पंचायत समिती सदस्य श्री. मंगेश सावंत, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक सन्मा. श्री. बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सन्मा. श्री. शिवाजी जगन्नाथ सावंत (सरचिटणीस, क.ग.शि.प्र. मंडळ, मुंबई यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक श्री. प्रसाद मसुरकर व श्रीम. पल्लवी हाटले यांनी केले. कार्यक्रमास उपस्थित राहिल्या बद्दल सर्व मान्यवरांचे सहा. शिक्षिका श्रीम. पल्लवी हाटले यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!