*कोकण Express*
*आम्ही आजही राष्ट्रवादीत, त्यामुळे झालेली हकालपट्टी हास्यास्पद…*
*काका कुडाळकरांचे प्रत्यूत्तर; जिल्हाध्यक्ष निष्क्रिय त्यांच्याचमुळे पक्षात दोन*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
आमचे नेते शरद पवार आहेत. काही झाले तरी आम्ही राष्ट्रवादी सोडली नाही. आणि सोडणार नाही. त्यामुळे आमची हकालपट्टी केली, असे जाहीर करणाऱ्यांची कीव येते. तो सर्व प्रकार हास्यास्पद आहे, असा पलटवार राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक काका कुडाळकर यांनी आज येथे केला. दरम्यान सध्या कार्यरत असलेले जिल्हाध्यक्ष हे निष्क्रिय आहेत. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीत दोन गट पडले. आणि पक्षाची पिछेहाट झाली. त्यामुळेच आम्हाला विकासासाठी अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे कुडाळकर यांनी सांगितले. काल कुडाळकर यांच्यासह अजित पवार यांच्या गटाच्या राष्ट्रवादीत गेलेल्या नऊ जणांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली होती. त्याला कुडाळकर यांनी आज या ठीकाणी पत्रकार परिषद घेवून प्रत्यूत्तर दिले. यावेळी प्रफुल्ल सुद्रीक हार्दीक शिगले आदी उपस्थित होते..