उंडील ता देवगड येथे गुरुपूर्णिमा उस्फूर्तपणे साजरी

उंडील ता देवगड येथे गुरुपूर्णिमा उस्फूर्तपणे साजरी

*कोकण Express*

*उंडील ता देवगड येथे गुरुपूर्णिमा उस्फूर्तपणे साजरी*

निसर्गरम्य उंडील ता देवगड येथे गुरुपूर्णिमा सोहळा सर्व वैश्य गुरुसेवकांच्या उपस्थितीत उत्साहाने भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला,सकाळी 10 वाजता या सोहोल्याची सुरुवात करणेत आली,सर्वप्रथम श्री गणेश पूजन,व्य।समुनी पूजन,वैश्यगुरु श्री श्री वामनाश्रम स्वामी महाराज यांचे फोटोपूजन,भजन, अभंग गायन,दुपारी अखंड महाप्रसाद असा सोहळा संध्याकाळपर्यंत सुरु होता
श्री गणेश पूजनाचा मान खजिनदार श्री दादा अन सौ शिवानी पारकर,कणकवली तर व्य।स मुनी अन श्री श्री वामनाश्रम स्वामी गुरुपूजन उंडील गुरुमठाचे अध्यक्ष श्री दादा अन सौ रंजना कुडतरकर यांचे हस्ते संपन्न झाले
गुरुपूर्णिमा दिवसाचे मानकरी होणेचा मान पूर्वनियोजित वैश्यसमाज वेंगुर्ले बंधू भगिनींना मिळाला,वेंगुर्ले,कणकवली येथील आदिशक्ती महिला मंडळ अन समस्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांनी सृश्राव्य भजने गायन करून वातावरण भक्तिमय केले तर सर्वश्री गनंजय तेली, प्रकाश पारकर बुवा अन सहयोगी यांनी अभंग गायन करून गुरुवंदना केली अन परिसर प्रसन्न केला
अध्यक्ष श्री दादा कुडतरकर यांनी पुराण काळ,सतयुग,त्रेतायुग,द्वापारयुग अन कलियुग।पर्यंत गुरुमहीमा कथन केला,श्री श्री वामनाश्रम स्वामी महाराज हे वैश्य समाजाचे गुरू अन अधिष्ठान असून त्यांचे आज्ञेनुसार भक्तिमार्ग हा सर्वश्रेष्ठ असून अध्यात्मिक नियमांचे पालन करणेत गुरुशिष्य यांचे नाते अधिक आदर्शवत अन दृढ व्हावे,गुरूंच्या चरणी आपले जीवन समर्पित केलेने उद्धार होतो,सद्गुरू हे गुरुमाऊली असून कठीण प्रसंगात आपले पाठीशी सदा उभे राहून संकटमुक्त करतात असा अनुभव नक्कीच येतो त्यामुळे भक्तीमार्गाचा नंदादीप अविरत तेवत ठेवा असे मार्गदर्शन केले,
मठाचे सचिव श्री संतोष टक्के यांनी प्रत्येक महिन्याचे पहिल्या रविवारी सदर मठात सत्संग सोहळा, गुरुपूजन, भजने,महाप्रसाद होणार असून सदर मठाची महती उत्तरोत्तर वाढनेसाठी वैश्य समाजातील गुरुसेवकानी सहकार्य करावे असे कथन केले,
यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वैश्य गुरुसेवकांची कमिटी करणेत आली अन गुरुमठाचा अध्यात्मिक दृष्ट्या सिंधुदुर्ग जील्ह्यात दूरवर प्रचार,प्रसार करनेचे ठरले
यावेळी वेंगुर्ले येथील सौ वृन्दा गवंडलकर अन सहयोगी महिला मंडळ,कणकवली येथील सुप्रसिद्ध आदिशक्ती सत्संग महिला मंडळ तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैश्य समाजातील नामवंत मंडलीसह शेकडो गुरुसेवकांची उपस्थिती लाभली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!