नुतन सभापती मनोज रावराणे यांचे “नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळ” आणि “नवदुर्गा युवा मंडळा” कडुन जल्लोषी स्वागत

*कोकण Express*

*नुतन सभापती मनोज रावराणे यांचे “नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळ” आणि “नवदुर्गा युवा मंडळा” कडुन जल्लोषी स्वागत-*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली पं. स. च्या सभापती पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत लोरे- घोणसरी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे *मनोज रावराणे* सभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याने नवीन कुर्ली गावाच्या वतीने *”नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळ”(रजि.)* व *”नवदुर्गा युवा मंडळ”(रजि.)* यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन कुर्ली फोंडाघाट येथे जल्लोषी स्वागत करण्यात आले.
*मौजे- नवीन कुर्ली गावाचा काही भाग व वस्ती ग्रामपंचायत लोरे- १ मध्ये येत असल्याने व लोरे- घोणसरी पं.स. मतदारसंघाचे मनोज रावराणे प्रतिनिधित्व करीत असल्याने गावातील ग्रामस्थांना रावराणे यांचे नेहमीचं सहकार्य मिळत आहे,तसेच माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे साहेब व युवा नेते आमदार नितेशजी राणे साहेब यांना मानणारा एक मोठा वर्ग नवीन कुर्ली गावात असल्याने व स्वत: मनोज रावराणे आमदार नितेश राणे यांच्या अत्यंत जवळचे आणि निष्ठावान कार्यकर्ते असल्याने मनोज रावराणे यांना निष्ठेचे फळ मिळाल्याने रावराणे यांची सभापतीपदी निवड झालेली समजतात नवीन कुर्ली गावात आनंदाच्या वातावरणात मनोज रावराणे यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.*
यावेळी ‘नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळा’चे *अध्यक्ष राजेंद्र कोलते,सदस्य प्रिया दळवी,योगीता मडवी,कृष्णा परब,प्रकाश दळवी,कृष्णा पोवार,मारुती कदम,अंकुश दळवी,प्रमोद पोवार,अशोक पिळणकर,अनंत दळवी,चंद्रकांत तेली,सदाशिव राणे* तसेच ‘नवदुर्गा युवा मंडळा’चे *सल्लागार अरुण पिळणकर,मंगेश मडवी खजिनदार प्रदिप आग्रे सदस्य अमित दळवी,सचिन परब,अनिल दळवी,हितेश फरांदे* आदी तसेच *पं.स.चे माजी उपसभापती तुळशीदास रावराणे,भाजप माजी तालुकाध्यक्ष राजन चिके,पं.स.सदस्य प्रकाश पारकर,लोरे नं- १ सरपंच अजय रावराणे,उपसरपंच अनंत रावराणे* आदी मान्यवर उपस्थित होते. रात्री- अपरात्री वेळे प्रसंगाला धावुन जावुन सहकार्य करण्यात मनोज रावराणे नेहमीचं तत्पर असतात. पं स सभापतीच्या कालावधीत लोकाभिमुख आणि गतिमान कारभार करून जनतेची कामे करण्यास भर देतील असे या स्वागतावेळी उपस्थितांमधुन बोलले जात होते,यावेळी नवीन कुर्ली गावातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते महिला वर्गाची उपस्थिती ही लक्षणीय होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!