*कोकण Express*
*उद्धव ठाकरे यांचा आणखी एक शिलेदार शिंदेंच्या शिवसेनेत…*
मुंबई, दि. ७ जुलै
राज्यातील राजकारणात वर्षभरापासून उद्धव ठाकरे यांना बसणारे धक्के काही कमी होत नाही. शिवसेनेतील एक एक नेते त्यांची साथ सोडून जात आहेत. वर्षभरापूर्वी उद्धव ठाकरे यांना सोडून ४० आमदार गेले. त्यानंतर राज्य अन् जिल्हापातळीवर अनेक नेते उद्धव ठाकरे यांना सोडून गेले. आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का दिला. शिवसेना ठाकरे गटातून त्या एकनाथ शिंदे गटात दाखल झाल्या. मुबईत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.
काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे
नीलम गो-हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामांमुळे देशाचा विकास झाला आहे. मोदी यांनी राम मंदिराची उभारणी, कलम ३०७ कलम हे प्रश्न सोडवले. महिलांचा प्रश्न आणि देशाचा विकास हा मुख्य उद्देश ठेऊन मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. सुषमा अंधारे यांचे महत्व उद्धव ठाकरे यांच्या गटात वाढल्यामुळे आपण नाराज झाल्या का? या प्रश्नावर त्यांनी नकार दिला. माझी भूमिका विकासाची आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकास होत आहे. त्यामुळेच मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतले.
काय म्हणाले एकनाथ शिंदेसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अनेक जण आपल्यापद्धतीने अर्थ लावत आहेत. त्यांना समाधान मानू द्या. परंतु आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे जात आहे. त्यात राज्याचा वाटा असला पाहिजे. हीच आमची भूमिका आहे. त्यामुळे मी आज नीलम गोऱ्हे यांचे पक्षात स्वागत करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आता आपणास महिलांसाठी मुक्तपणे काम करता येईल, असे त्यांनी सांगितले.