*कोकण Express*
*कणकवली पंचायत समिती सभापती पदी मनोज रावराणे बिनविरोध*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवलीपंचायतसमिती सभापती पदासाठी आज झालेल्या निवडप्रक्रियेत मनोज रावराणे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. तहसीलदार तथा पीठासन अधिकारी आर. जे.पवार यांनी ही निवड जाहीर केली आहे. कणकवली पंचायत समितीमध्ये १६ पैकी १५ सदस्य भाजपाचे आहेत त्यामुळे ही निवडणूक पूर्णतः बिनविरोध होणार हे यापूर्वीच निश्चित झाले होते. मंगळवारी मनोज रावराणे यांच्या नावावर भाजपा नेते खासदार नारायण राणे यांच्या कडून शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यानंतर विहित प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सभापती निवड प्रक्रियेसाठी विशेष सभा घेण्यात आली. या सभेत मनोज रावराणे यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकार्यांनी जाहीर केले.
मनोज रावराणे हे राजकीय व सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असणारे नाव म्हणून ओळखले जाते. आमदार नितेश राणे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे. नितेश राणे यांच्यासोबत युवा मोर्चाच्या माध्यमातून राजकारणात उडी घेतलेल्या मनोज रावराणे यांना तालुक्याच्या प्रथम नागरिक म्हणून बहुमान मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. मनोज रावराणे यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांनी दुपारपासूनच आनंदोत्सव साजरा केला. भाजपाचे झेंडे व फटाक्यांच्या आतषबाजीत ढोल-ताशांच्या गजरात पंचायत समितीचा परिसर निनादून गेला. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, जिल्हा परिषद सभापती बाळा जठार, माजी सभापती दिलीप तळेकर, सुजाता हळदीवे, उपसभापती दिव्या पेडणेकर, माजी उपसभापती तुळशीदास रावराणे, पंचायत समिती सदस्य स्मिता मालडीकर, सुचिता दळवी, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,संतोष कानडे,भाग्यलक्ष्मी साटम, महेश लाड, सुभाष सावंत, माजी उपसभापती महेश गुरव, लोरे सरपंच अजय रावराणे, भाजपाचे प्रसिद्धीप्रमुख बबलू सावंत, स्वप्निल चिंदरकर आदीसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.