*कोकण Express*
*भाजपच्या अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्षपदी सोनिया मठकर…..*
*विधानसभा उपाध्यक्ष सपना जांभोडकर, मंडल अध्यक्षांचीही नियुक्ती…..*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी सोनिया मठकर तर विधानसभा महिला उपाध्यक्षपदी सपना
जांभोडकर यांची आज निवड करण्यात आली. तर आंबोली मंडळ अध्यक्षपदी गुरुनाथ कासले, वेंगुर्ले अध्यक्षपदी बाळा जाधव, बांदा मंडळ अध्यक्षपदी संजय डिंगणेकर, दोडामार्ग अध्यक्षपदी प्रकाश कदम याची निवड करण्यात आली आहे. माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते त्यांना आज गौरविण्यात आले.
यावेळी अनुसूचित मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, आंबोली मंडळ अध्यक्ष रवींद्र मडगावकर, स्नेहल कासले, बाळा जाधव, नामदेव जाधव उपस्थित होते.