फोंडाघाट माळवाडी शाळेत विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप

फोंडाघाट माळवाडी शाळेत विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप

*कोकण Express*

*फोंडाघाट माळवाडी शाळेत विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

फोंडाघाट माळवाडी शाळेत विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप
प्राण जीवन सहयोग संस्था शिरवल यांच्या तर्फे फोंडाघाट जिल्हा परिषद – माळवाडीतील विद्यार्थ्यांना रेनकोट चे वाटप करण्यात आले. या शाळेतील सर्व ५४ मुले शिकत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना संस्था अध्यक्ष श्री. संदीप
चौकेकर यांच्या हस्ते रेनकोट वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी जीवनाचा आनंद घेत शिक्षणातून आपली प्रगती करावी. हेच विद्यार्थी उद्याचे भविष्य आहेत. विद्यार्थ्यांनी शिक्षणातून आपले भविष्य उज्ज्वल करावे. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश वंजारे, संदीप तांबट, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. जोशी मॅडम, गोसावी मॅडम उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!